कलम ३७० वरील गाणं भलतच ‘भन्नाट’, ‘ले लेबे जम्मू कश्मीर में जमीन’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील जम्मू काश्मिरशी निगडीत कलम ३७० रद्द केल्यानंतर देशात सर्वत्र केंद्र सरकारची वाहवाही होत आहे. तसंच गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही वाहवाही होत आहे. भोजपुरी चित्रपट सृष्टीनेतर चक्क चित्रपटातील गाणी कलम ३७० वर केली आहेत. ही गाणी सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=jVkNd1JjD1s

युट्यूबवर भोजपुरी गाणी शोधल्यानंतर बरीच नवीन गाणी समोर येत आहेत. या गाण्यांमध्ये भोजपुरी येथील सुप्रसिद्ध गायक आणि कलाकारांच्या गाण्यांचा यात समावेश आहे. ही गाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक करणारी आहेत. ही गाणी प्रेक्षकांच्या पंसतीस पडत आहेत. त्यामुळे या गाण्यांना लाखो लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी लाईक करून कमेंट्सही दिल्या आहेत.

हात गेल कलम ३७० हे भोजपुरी गाणे सुगान शर्मा यांनी शब्दबद्ध केले आहे. तसंच शैलेश शर्मा यांनी हे गाणे गायले आहे. भोजपुरी गायक राजीव राजधानी यांनी कलम ३७० हटवल्याबद्दल अभिनंदन करणारे गाणे गायले आहे. हे गाणेही खूप व्हायरल होत आहे. तसंच काश्मिरमध्ये जमीन घेण्याची प्लॅनिंग करणारे गाणेही येथे आहे. हे गाणे सर्वाधिक व्हायरल होत आहे. ले लेबे जम्मू कश्मीर में जमीन, असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे गुंजन सिंह आणि अंजली भारती यांनी गायले आहेत.

 

आरोग्यविषयक वृत्त