भोजपुरीत ‘कोरोना’ व्हायरसवर बनवलं गाणं, लोक म्हणाले – ‘लाज वाटू द्या’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर कोरोना व्हायरस साँग व्हायरल होताना दिसत आहे. चीनसहित इतर देशता दहशत निर्माण करणाऱ्या कोरोनावर भोजपुरी म्युझिक इंडस्ट्रीनं गाणंच तयार केलं आहे. सध्या या गाण्याची खूप चर्चा होताना दिसत आहे. लोकांना हे गाणं अजिबात आवडलं नाही.

रितेश पांडे आणि स्नेहा उपाध्याय यांचं व्हायरल गाणं हैलो कौनच्या चालीवर हे गाणं तयार करण्यात आलं आहे. व्हिडीओत दोन कपल दिसत आहेत. या गाण्यात प्रियकर आणि प्रेयसी यांचा संवाद दाखवण्यात आला आहे. चीनमधील रुग्णालयातील काही सीन्सही गाण्यात दिसत आहेत. गाण्याचे लिरिक्सही खूप खराब आहेत. हे गाणं युट्युबसहित तर सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. कारण प्रेयसी प्रियकराला भेटायला नकार देते. कारण तो कोरोना व्हायरल घेऊन आला आहे असं तिचं म्हणणं आहे. खुशबू उत्तम आणि प्रवीण उत्तम यांनी हे गाणं लिहिलं असून त्यांनीच हे गाणं गायलं आहे.

‘अशी’ आहे लोकांची प्रतिक्रिया

या गाण्यावर कमेंट करताना एकानं म्हटलं आहे की, लोक मरत आहेत आणि तुम्ही टीआरपीसाठी तुम्ही काहीही गात आहात. थोडी लाज वाटू द्या. आणखी एक युजर म्हणतो, मला तर वाटतं की, दोघांना खरंच कोरोनाची लागण झाली आहे. एकजण कमेंट करताना म्हणाला, कोणती नशा केली ? एक म्हणतो, हेच मिळालं का गायला. काहींनी तर हे गाणं गंभीरतेनं घ्या आणि त्याची खिल्ली उडवू नका असंही म्हटलं आहे.