Coronavirus : भोकर तालुक्यात 550 जणांना शिक्के मारून केलं ‘होम क्वारंटाईन’

भोकर:-(माधव मेकेवाड) : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे गुजरात व इतर राज्यातून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी करण्यात आली आहे. बाहेर गावाहून आलेल्या 550 जणांना शिक्के मारून होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेऊन नागरिकांना वैद्यकीय पथकामार्फत घरी जाऊन शिक्का मारण्यात येत आहे. शिक्का मारलेल्या नागरिकांना १४ दिवस घरातच विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय पथक नेहमी त्यांच्या प्रकृतीची तपासणी करत आहे.

पण त्याच्यातील काही ‘होम क्वारंटाइन’ बाहेर फिरत आहेत प्रशासनाने त्यांना सक्ती करण्याची गरज आहे किंवा त्याचा मोबाईल लोकेशन घेण्यात यावे कोरोनाच्या धोक्याविषयी वारंवार सूचना देऊनही नागरिक ऐकायला तयारी नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.तालुक्यात बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांवर आशा वर्कर्स , अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, पालिका कर्मचारी यांच्यातर्फे 550 जणांना शिक्के मारलेले आहे. त्यासाठी न पुसणारी निवडणुकीची शाई वापरण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवस त्या व्यक्तीच्या हातावर शिक्का उमटलेला राहील शिक्के मारलेल्या लोकांना १४ दिवस घरातच राहण्याच्या सक्त सूचना असून असे लोक बाहेर दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.आणि काही लोकं मुंबई पुण्यातुन सिक्का न मारताच आले आहेत त्याची माहिती प्रशासनाला देण्यात यावी असे यावेळी सांगितले गेले आहे.