भोकरजवळ शेतात वीज पडून १ ठार तर १ जखमी

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड) – भोकर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून एका शेतमजूराचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

देविदास गणेश उपाडे (वय ४१ वर्षे) असे वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीराव रामराव देशमुख (बारडकर) यांच्या शेतातील गडी देविदास गणेश उपाडे यांच्या अंगावर आज सायंकाळी ६ वाजता वीज कोसळली. त्यावेळी त्यांचा ७ वर्षांचा मुलगादेखील सोबत होता. त्यालाही वीजेची झळ बसून तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर महेश वाकडे यांच्या सोबत शेख मुसा शेख सरवर व तलाठी नरेंद्र मडगुलवार यांनी पाहणी केली. उपाडे यांच्या पश्चात २ मुले, पत्नी असा परिवार आहे.