भोकर न्यायालयातील लोकअदालतीत ६३ लाख ६२ हजाराची ‘विक्रमी’ वसुली !

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन – येथील जिल्हा सत्र न्यायलयात आज १३ जुलै २०१९ रोज शनिवारी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यात दिवाणी व फौजदारी स्वरूपाची न्यायालयात प्रलंबित असलेली २९८ प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी ६२ प्रकरणी निकाली काढण्यात आली आहेत. त्यात ३९४४६९४ रुपये एवढ्या विक्रमी रकमेच्या वसुलीसाठी अवार्ड पास करण्यात आले. पोटगी व कौटुंबिक वाद या प्रकरणातील अनिता पाशमवाड रा.सावरगाव व पातन्ना पाशमवाड रा.कोसमेट ता. किनवट या जोडप्यांचे कौटूंबीक वाद संपूष्टात आणून एकमेकात समझौता करून त्यांना साडी-चोळी करून सुखाने नांदावयास पाठवत माहेरची भुमीका न्यायालयाकडून वठवण्यात आली.

आजच्या लोकअदालतीत दाखल पूर्व प्रकरणे ८८१० पेक्षा जास्त ठेवण्यात आलेली होती त्यात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, भोकर व उमरी येथील थकबाकीपोटी विज पुरवठा खंडित करण्यात आलेली प्रकरणे व भारतीय स्टेट बॅँक शाखा भोकर, मातूळ महाराष्ट्र ग्रामीण बैंक भोकर,  देना बैंक भोसी, महिंद्रा फायनांन्स भोकर, भोकर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील थकीत करदाते व भारत संचार निगम भोकर येथील थकीत दूरध्वनीधारक आदींचे प्रकरणे न्यायालयासमोर ठेवण्यात आले आले होते.

या राष्ट्रीय लोकअदालतीमधे ठेवण्यात आलेल्या एकूण प्रकरणापैकी ६३९ प्रकरणे निकाली काढून २४,१८,१६३ एवढया एकमेची वसूलीसाठी अवार्ड पास करण्यात आले. असे एकूण तालुका विधी समिती समोर ७०१ प्रकरणे निकाली काढून ६३ लाख ६२ हजार ८५७ एवढया विक्रमी वसूलीचे अवार्ड पास करण्यात आले. यावेळी न्यायदानाची प्रमूख भुमिका जिल्हा सत्र न्यायधिश मुजीब शेख, सत्र न्यायाधिश एन.के. त्रिभूवन, दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधिश एन.पी. पांडे, दिवाणी न्यायधिश ए. एन. पठाण, सहदिवाणी न्यायधीश बी. ए. तळेकर आदी न्यायाधिशांनी पार पाडली. त्यास अभिवक्ता संघाकडून विशेष सहकार्य करण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या