विद्यार्थी नाही तर चक्क प्राध्यापकांनी केले कामबंद आंदोलन

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापक संघटनेनी कामबंद आंदोलन सुरु केले होते, त्या आंदोलनाला २४ प्राध्यापकांनी पाठिंबा दर्शविला आहे. बरेचवेळा विध्यार्थ्यांना आंदोलन करते वेळी पहिले आहे. मात्र यावेळी विध्यार्थ्यांनाच घडवणारे गुरुजीच काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. ऐन परीक्षेच्या तोंडावर प्राध्यापक संघटनांनी दि २९ पासून काम बंद आंदोलन केल्याने विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’078d35b5-c933-11e8-898a-7351eda2a362′]

प्राध्यापक भरतीवरील बंदी त्वरित उठवावी,बेकायदेशीर कपात केलेले ७१ दिवसाचे वेतन त्वरित अदा करावे,सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी त्वरित करावी,अंशदान पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी,विनाअनुदानित महाविद्यालयातील वेतन व्यवस्था नियमित करावी,मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समान वेतन या तत्वाची अंमलबजावणी करण्यात यावी ,शिक्षक समस्या निवारण यंत्रणा त्वरित करण्यात यावी ,सहाव्या वेतन आयोगाच्या त्रुटींची सुधारणा करावी अश्या अनेक मागण्यांची सरकार कडून पूर्तता व्हावी या साठी प्राध्यापक संघटनेने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले होते.

इतकेच नव्हे तर, विद्यार्थी हित जोपासून सर्व कामे स्वीकारलेली आहेत, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर प्राध्यापक संघटनेतर्फे काम बंद आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूदही करण्यात आले होते.

अंडरवर्ल्ड डॉनचा साथीदार आमचाच नागरिक : पाकिस्तान

हे निवेदन ५ सप्टेंबरला उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिले यावेळी प्रा. पंडित संग्राम,प्रा.डॉ.काळे संजय,प्रा.डॉ.भिसे रामचंद्र, प्रा.डॉ.पवार शिवाजी,प्रा.डॉ.नेम्मानीवार भुपेश, प्रा.थोरात एस,प्रा.डॉ.बिरादार.एम.एन प्रा.डॉ.जाधव जे डी,प्रा.जयवर्धन बलखंडे, प्रा.सक्करगे नागोराव,प्रा.अरविंद सोनटक्के, प्रा.सतीश चव्हाण,प्रा.डॉ.अरविंद चव्हाण, प्रा.भुसारे दीपक, प्रा.डॉ.तावडे सचिन, प्रा.हट्टेकर व्ही, प्रा.जाधव व्ही, प्रा.ढोले एन ए , प्रा.तिवडे एस एस, प्रा.फेगडे माधव, प्रा.ओमप्रकाश कदम, प्रा.येगावकर एम बी, प्रा.कदम आर आदी उपस्थित होते.

[amazon_link asins=’9312146378,9332551731′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5bab37e9-c934-11e8-84d0-8def411d56ee’]