शिवसेनेच्या भोकर विधानसभा मतदारसंघावर भाजपाची नजर ?

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – गेली साडेचार वर्ष एकमेकांचे उणेदुणे काढत भाजपा शिवसेनेने ऐन लोकसभा निवडणुकीपुर्वी युती करून महाराष्ट्रसह नांदेड लोकसभा निवडणुकीत इतिहास रचुन घवघवीत यश मिळवले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहील यात शंका नसतानाच भाजपाने भोकर विधानसभा लढण्याची तयारी केल्यामुळे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारामध्ये अस्वस्थता पसरली आहे. नांदेड लोकसभा मध्ये भाजपाचा विजय झाल्यामुळे सेनेसमोर अडचन उभी झाली आहे. त्यातच आता भाजपा भोकर विधानसभा लढण्याची तयारी करीत असल्याने युती धर्म धोक्यात येणाची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने “अब कि बार २२० के पार” असे ध्येय ठेवत विधानसभेची तयारी करण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले आहेत. या निर्देशावरून सध्या युती मध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

शिवसेनेने भोकर विधानसभा क्षेत्रात  प्रत्येक गावागावात प्रत्येक वार्डासाठी शाखा करून बुथ निहाय बांधनी केली आहे. भोकर तालुका अध्यक्ष अमोल पवार यांनी शिवसेनेचे नेटवर्क मोठया प्रमाणात मजबुत केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे ईच्छुक उमेदवार ही मतदारसंघात नियमीत संपर्क ठेवुन आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भोकर विधानसभा हे शिवसेनेच्या वाट्यातील मतदारसंघांमध्ये हक्काचे उमेदवार असताना आयात उमेदवारांवर लक्ष ठेऊन, ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार नाही, अशा जागेवर भाजपने डोळा ठेवला आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीला दोन महिने उरले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर विधानसभेच्या तयारीसाठी सर्वच पक्षांतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मातोश्रीवर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या पुर्वी झाली आहे. यासाठी भोकर तालुक्यातील शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल पवार शिवसेनेचे नेते गेले होते. या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे कोणता निर्णय जाहीर करणार, याची उत्सुकता सर्व कार्यकर्त्यांना आहे.मागील निवडणुकीत शिवसेनेचे नेते भीमराव क्षीरसागर व बबन बारसे यांनी निवडणूक शिवसेनेकडून लढवली त्यांना थोड्याफार मताने पराभूत झाले.

हिन्दु ऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत गेली अनेक वर्षे पक्षवाढीचे काम केले असे धनराज पवार देखील यांनी आपल्याला शिवसेनेकडुन भोकर विधानसभेची उमेदवारी मिळावी, ही अपेक्षा ठेवुन आहेत. शिवसेनेकडून सेनेचे तालुका अध्यक्ष अमोल पवार यांचे वडील धनराज पवार हे सुध्दा इच्छुक आहेत. पण या मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर भाजप येण्यास तयारी दाखवली आहे. त्यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. अशीही चर्चा शहरात सुरू आहे तर भाजप कडुन बहुजन नेते नागनाथ घिसेवाड भोकर मतदार संघात निवडणुक लढवण्याची तयारी करून ईच्छुक आहेत. तर या सर्व परिस्थितीत शिवसेनेच्या मतदारसंघांवर भाजपने उमेदवार तयार ठेऊन डोळा ठेवला आहे अशी राजकिय चर्चा होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !