महिलेशी अश्लील चाळे करण्याऱ्या भोंदूबाबाला सक्तमजुरी

ठाणे : पोलीसनामा आॅनलाईन – मूल होत नसल्याने दाम्पत्याला एका भोंदूबाबाने स्वत: समोर शरीरसंबंध ठेवण्यास सांगणाऱ्या भोंदूबाबाला दहा वर्ष करावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. हा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला होता. पीडित महिलेशी हा भोंदूबाबा लैंगिक चाळेही करत असे. योगेश कुपेकर (४५) असे या भोंदूबाबाचे नाव असून त्याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल न्या.पी.पी.जाधव यांनी दिला. सरकारी वकील म्हणुन अ‍ॅड. रेखा हिवराळे यांनी काम पाहिले.

हा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर येथे जुलै २०१६ मध्ये घडला होता. पिडीत दांपत्याशी या भोंदूबाबाचे हे अश्लिल चाळे तब्बल अडीच वर्ष सुरू होते. अखेर शरीराशी लगट करू लागल्याने पतीचा विरोध न जुमानता पीडित महिलेने भोंदू बाबाची तक्रार वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर भोंदूला पोलिसांनी अटक केली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की, विवाहानंतर संतती प्राप्ती होत नसल्याने दाम्पत्य अखेर भोंदूबाबा योगेश कुपेकर याच्याकडे गेले. कुपेकर याने दाम्पत्याला संतती प्राप्तीची हमी देऊन त्यांच्याकडून १० हजार रुपये उकळले. तब्बल अडीच वर्ष संतती प्राप्तीसाठी पूजापाठाच्या नावाखाली हा प्रकार सुरू होता.

दरम्यान भोंदू बाबाने दाम्पत्याला त्याच्या समक्ष शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. यास पत्नीने विरोध केला मात्र पतीने न ऐकल्याने अखेर हा घृणास्पद प्रकार करण्यात आला. त्यानंतर भोंदूबाबा या दाम्पत्याकडून पैसे उकळतच होता. या धक्कादायक प्रकारामुळे धास्तावलेल्या महिलेने अखेर जीवन संपविण्याचा प्रयत्नही केला होता. अखेर दाम्पत्याने जुलै २०१६ मध्ये वर्तकनगर पोलीस ठाण्यात भोंदू बाबा योगेश कुपेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. वर्तकनगर पोलिसांनी त्याला अटक केली. सदर प्रकरणी न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. योगेश कुपेकर (४५) या भोंदूबाबाला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

जाहिरात