भूम : अलमप्रभू JCB मशीन संघटनेच्या अध्यक्षपदी राजाभाऊ माने यांची निवड

भूम : पोलीसनामा ऑनलाइन – भूम तालुक्यातील अलमप्रभू जेसीबी मशीन संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी राजाभाऊ माने यांनी तर उपाध्यक्षपदावर शिवाजी साबळे यांची निवड करण्यात आली आहे. शहरातील साहिल कॉम्प्लेक्स येथील सभागृहात बुधवारी (दि.3) झालेल्या बैठकीत संघटनेची स्थापना करुन कार्यकारणी नियुक्त करण्यात आली.

संघटनेच्या कार्यकारणीमध्ये सचिवपदी दत्ता गाढवे, रवींद्र टिपे, जयसिंग गोपणे, सुमित तेलंग, सतीश लष्कर यांची निवड करण्यात आली. यावेळी संजय पाटील-आरसोलीकर, दीपक हांडे, काकासाहेब हुरकुडे, पप्पू गाडे, राजू पठाण, प्रवीण कुटे, सचिन मदने हबीब जमादार, हौशेराव आडसूळ, प्रदीप शेलार, नितीन जगदाळे, गिरीश साठे, बंटी काळे, विजय काळे, औदुंबर लांडे, पिंटू जगदाळे, गन्नी पठाण, मुन्ना जमादार, काका गोरे, धनंजय गुंजाळ, औदुंबर गिलबिले, बापू केसकर, गणेश डिसले, कृष्णा पांढरे, भरतरी वारे, शंकर कदम, राहुल करडे, किरण दांडे, अण्णा तांबे, बालाजी हाके यांच्यासह मशिन मालक-चालक मोठ्या संखेने उपस्थित होते.