कोळविहिरे येथे 21 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – (संदीप झगडे) : कोळविहिरे ( ता. पुरंदर ) येथे सुमारे २१ कोटी रुपयांच्या रस्ते व विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. कोळविहिरे, भोरवाडी व जोगवडी या रस्त्याच्या कामचे भूमिपूजन, खासदार सुप्रिया सुळे यांच्या निधीतून पाच लाख रुपयांच्या पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे, तर जिल्हा परिषदेच्या निधीतून कोळविहिरे ते काळा ओढा या पाच लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा त्यात समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोळविहिरे परिसरात अनेक कामे झाली आहेत. येथील रखडलेले पेयजल योजनेच्या कामासाठी पाठपुरावा केला जाईल, असे देवकाते यांनी सांगितले. जेजुरी औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी सातबारा उताऱ्यावर टाकण्यात आलेले शिक्के काढण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी सांगितले. माजी सरपंच बापू भोर व माजी सरपंच महेश खैरे यांनी कोळविहिरे परिसरात झालेल्या विकासकामांची माहिती दिली.

या वेळी विजय कोलते, सुदाम इंगळे, दत्तात्रेय झुरंगे, महेश खैरे, राहुल नाणेकर यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाला डॉ . दिगंबर दुर्गाडे, माणिक झेंडे, प्रदीप पोमण, गणेश जगताप, सरपंच मालन झगडे, विराज काकडे, अ‍ॅड. धनंजय भोईटे, श्यामकांत भिंताडे, राजेश चव्हान, संभाजी काळाणे, महेंद्र माने उपस्थित होते. आमदर संजय जगताप यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. मात्र, दिवे घाटातील वारकरी दुर्घटना व शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने सत्कार सभारंभ रद्द करण्यात आला. माजी सरपंच बापू भोर यांनी प्रास्ताविक केले. सोपान जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले . सोमनाथ खोमणे यांनी आभार मानले.

Visit : Policenama.com