Bhoot Movie Review : फ्रेश स्टोरी असणारा विकी कौशलचा ‘भूत’ अंगावर काटे आणतो, कधी करतो ‘सुन्न’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – धर्मा प्रॉडक्शननं पहिल्यांदाच हॉररमध्ये पाऊल टाकलं आहे. अभिनेता विकी कौशलचाही हा पहिलाच हॉरर सिनेमा आहे. नुकताच (21 फेब्रुवारी 2020) भूत हा सिनेमा रिलीज झाला आहे. चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं मोठं आव्हान त्याच्यासमोर होतं. मेकर्स आणि विकी चाहत्यांच्या अपेक्षांवर किती खरं उतरलेत ते जाणून घेऊयात.

काय आहे सिनेमाची स्टोरी ?
एक शिपिंग ऑफिसर आहे ज्यानं आपली लहान मुलगी आणि पत्नी (भूमी पेडणेकर) गमावली आहे. मुंबईत हा ऑफिसर एकटाच रहात असतो. त्याचं नाव पृथ्वी (विकी कौशल) आहे. पृथ्वी त्यांच्या मृत्यूसाठी स्वत:लाच जबाबदार धरत असतो. त्याच्या डोक्यात ही गोष्ट एवढी फिट बसते की त्याला सगळीकडे त्या दिसू लागतात. तो यावर उपचार घेत असतो. परंतु औषध घेत नसतो. कारण त्याला त्या दिसतात हे त्याला आवडत असतं. एकदा अचानक समुद्राच्या किनारी एक सुनसान जहाज येतं.

हे जहाज हटवण्याची जबाबदारी पृथ्वीवर असते. पृथ्वी जेव्हा काम सुरु करतो तेव्हा त्याच्या अंगावर शहारे आणणारं एक कोडं सोडवण्यात व्यस्त होतो. हे कोडं सोडवतानाच कथेचा उलगडा होत असतो. कॉन्सेप्ट नवीन आहे असं म्हणता येईल. मध्येच कॉमेडीदेखील आहे. सी बर्डचं काय सिक्रेट आहे ज्यामुळे लोकांचा जीव जातो ? विकीचा त्या जहाजासोबत काही कनेक्शन आहे का ? विकीसोबत पुढे काय होतं हीच या सिनेमाची स्टोरी आहे.

कसा आहे सिनेमा ?
विकी कौशलची अ‍ॅक्टींग कमालची आहे. त्यानं पुन्हा एकदा अभिनेता म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. भूमी पेडणेकर आणि आशुतोष राणा यांची भूमिका लहान असली तरी त्यांनी चांगल्या प्रकारे केली आहे. हा सिनेमा चाहत्यांना घाबरवतो का ? तर हो. या सिनेमातील व्हीएफएक्स आणि ग्राफीक्स चांगल्या प्रकारे वापरले आहेत. कधी अंगावर शहारा येतो तर कधी तुम्ही सुन्न होता.

You might also like