Coronavirus : फक्त सर्दी-खोकला, ताप नव्हे तर ‘कोरोना’चे हे आहेत 18 लक्षण, ‘या’ राज्यातील सरकारनं जाहीर केली नवी ‘गाईडलाइन’

भोपाळ : वृत्त संस्था  – कोरोनाच्या संकटकाळात केंद्र आणि राज्य सरकार कोरोनावरील उपचारांपासून डिस्चार्जपर्यंत गाईड लाईन जारी करत आहे. या गाईड लाईन्स तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर जारी करण्यात येतात. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांची संख्या पाहता केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईड लाईनने संशयित रूग्णांची स्क्रिनिंग, सॅम्पलिंगपर्यंत उपचार करणार्‍या मेडिकल स्टाफच्या क्वारंटाईनबाबत अनेक बदल केले आहेत.

नव्या बदलात हे आदेश जारी केले आहेत की, आता पीपीई किट घालून कोरोना रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि स्टाफला क्वारंटाईन केले जाणार नाही. भोपाळमध्ये आरोग्य आयुक्तांच्या आदेशानंतर जीएमसीच्या डीनने क्वारंटाईनमधील स्टाफला तात्काळ सेंटर रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. या सोबतच आरोग्य विभागाने कोरोनाच्या लक्षणांची यादी जारी केली आहे. केंद्र सरकारच्या या गाईडलाईननंतर भोपाळचे आरोग्य आयुक्त फैज अहमद किडवई यांनी सर्व जिल्हा कलेक्टर्स आणि सिव्हिल सर्जन यांना आदेश जारी करून या यादीप्रमाणे लक्षणे असलेल्या संशयित आणि पॉझिटीव्ह रूग्णांना रूग्णालयांमध्ये रेफर करण्याचे आदेश दिले आहेत.

ही सुद्धा आहेत कोरोनाची लक्षणे
आता कोरोनाच्या मुख्य लक्षणांमध्ये केवळ सर्दी, खोकला, घशात खवखव आणि ताप हीच लक्षणे असणार नाहीत. कोणतीही लक्षणे नसलेल्या रूग्णांचे रिपोर्टही पॉझिटीव्ह येऊ लागले आहेत. हे ध्यानात घेऊन नव्या गाईड लाईनमध्ये आता जवळपास 15 प्रकारची नवी लक्षणे संशयित मानली जातील. आता जीव घाबरणे, उलटी, कफ, चव आणि वास ओळखता न येणे, चालताना त्रास, त्वचेवर डाग, हातापायांच्या बोटांचा रंग बदलणे, ओठ आणि चेहर्‍याचा रंग निळा पडणे, अशी स्थितीसुद्धा आता कोरोनाची लक्षणे मानली जातील.

नव्या गाईड लाईननुसार पीपीई किट घालून उपचार करणार्‍या स्टाफला क्वारंटाईन करण्यात येणार नाही. आता केवळ नॉन कोविड वार्डात दाखल अन्य रूग्णांमध्ये एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यास त्याच्यावर उपचार करणार्‍या स्टाफलाच क्वारंटाईन करण्यात येईल.