विकृतीचे शिखर ! गाईसोबत 55 वर्षीय इसमाचा अतिप्रसंगाचा प्रयत्न

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये किळसवाणा प्रकार घडला असून एका 55 वर्षीय नागरिकाने गाईसोबत अतिप्रसंग केला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कृत्य गोठ्यात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर डेअरी मालकानं मंगळवारी पोलीस स्थानकात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेच्या काही दिवस आधी आणि नंतरचे फुटेज पोलीस अधिकारी सध्या तपासात आहेत. भोपाळचे पोलीस स्टेशनचे प्रभारी आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले की, 55 वर्षीय व्यक्तीने गायीशी अनैसर्गिकरित्या अतिप्रसंग केल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे.

त्यानुसार पोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही तपासून प्रकरणात चौकशीही केली जात आहे. हा प्रकार घडण्याची पहिली घटना आहे, त्यामध्ये गाईशी लैंगिक संबंध ठेवल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात अद्याप चौकशी सुरू आहे. फुटेजचीही तपासणी केली जात आहे.