भारतात पाहिल्यांदाच ‘कोरोना’ रुग्णाच्या ‘बॉडी’चं केलं ‘पोस्टमॉर्टम’, आता होणार व्हायरसच्या परिणामांचा खुलासा, मिळणार महत्वाची माहिती

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळ AIIMS ने ICMR कडे कोरोनावरील संशोधनासाठी संक्रमित रुग्णाच्या शवविच्छेदानाला मंजुरी देण्याची मागणी केली होती, पण संक्रमणाचा धोका लक्षात घेता परवानगी देण्यात आली नव्हती.

कोरोना संक्रमित रुग्णाचे पहिल्यांदाच पोस्टमॉर्टम

संशोधन पूर्ण झाले तर मिळणार अनेक प्रश्नांची उत्तरं

देशात पहिल्यांदाच कोरोना संक्रमित रुग्णाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. या पोस्टमॉर्टमचा मुख्य उद्देश कोरोना रुग्णावरील संशोधन हाच होता. कोरोना विषाणू मृत व्यक्तीच्या शरीरात किती वेळापर्यंत जिवंत राहतो आणि शरीराच्या कोणत्या भागावर याचा अधिक परिणाम होतो याचा शोध लावण्यासाठी हा पोस्टमॉर्टम करण्यात आला आहे.

पोस्टमॉर्टम साठी मंजुरी देणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी भोपाळमध्ये असणाऱ्या AIIMS (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान) ला ICMR ( इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) कडून परवानगी घ्यावी लागली. त्यामुळेच रविवारी कोरोना संक्रमित रुग्णाचा पोस्टमॉर्टम करता आला.

भोपाळ AIIMS ने याआधी ICMR कडे कोरोनावरील संशोधनासाठी संक्रमित रुग्णाच्या शवविच्छेदानाला मंजुरी देण्याची मागणी केली होती, पण संक्रमणाचा धोका लक्षात घेता परवानगी देण्यात आली नव्हती. भोपाळ AIIMS ने कोरोना संक्रमण रोखण्याच्या उपायांसोबतच पोस्टमॉर्टमची ऍडव्हान्स टेक्निक बद्दल ICMR कडे माहिती दिल्यानंतर ही मंजुरी देण्यात आली.

रविवारी कोरोना संक्रमित रुग्णाचा पोस्टमॉर्टम करण्यात आला. त्यावेळी पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांच्या टीम ने पीपीई किट परिधान करून सुरक्षितपणे हे काम केलं. भोपाळ AIIMS ने असा दावा केला आहे की, कोरोना रुग्णाचे पोस्टमॉर्टम करण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. आता आणखी काही मृत कोरोना रुग्णाचे पोस्टमॉर्टम केले जाईल आणि त्यानंतर अंतिम रिपोर्ट तयार होईल.

भोपाळ AIIMS चे डायरेक्टर डॉक्टर सरमन सिंह यांनी सांगितले कि, ‘पोस्टमॉर्टम मुळे कोरोना विषाणू मुळे होणाऱ्या परिणामाची माहिती समोर येऊ शकेल. विषाणू हृदय, मेंदू, फुपुस्से यावर कितपत परिणाम करतो याबद्दलची आधिक माहिती मिळू शकेल.

फॉरेन्सिक मेडिसिन शिवाय अन्य तीन विभागातील टीमने देखील दोन तास पोस्टमॉर्टम केले. यामुळे आता शरीराच्या कोणत्या भागावर याचा अधिक परिणाम होतो याचा शोध लागेल.