लग्नाच्या 3 वर्षानंतरही पतीचा जीव आडकला प्रेयसीमध्ये, मदत म्हणून पत्नीनं ‘विभक्त’ होत करून दिलं त्यांचं लग्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मध्य प्रदेशला उगाच विचित्र म्हणत नाही कारण येथे अनेक विचित्र प्रकरणे समोर येतात. अशीच एक घटना आता राजधानी भोपाळमध्ये समोर आली आहे जिथे एका महिलेने तिच्या पतीला त्याच्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी तीन वर्षानंतर मदत केली. आपल्या पतीला व त्याच्या प्रियसीला पुन्हा एकत्र येण्यासाठी या महिलेने आपल्या पतीला घटस्फोट देण्यास मागे पुढे पाहिले नाही.

वकीलांनी माहिती दिली

महिलेच्या वकिलाने सांगितले की, लग्नाच्या तीन वर्षानंतरही या महिलेच्या पतीचे मन आपल्या जुन्या प्रियसीकडे लागले होते, अशा परिस्थितीत त्या महिलेने पतीला घटस्फोट दिला जेणेकरून तो आपल्या प्रियसीशी लग्न करू शकेल. वकिलाने सांगितले की, त्याची त्या दोघींसोबत वैवाहिक संबंध ठेवण्याची इच्छा होती, परंतु कायदेशीररित्या ते शक्य नव्हते. अशा परिस्थितीत परिपक्वतेचे उदाहरण देऊन महिलेने पतीला घटस्फोट दिला, जेणेकरून तो लग्न करु शकेल.

गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती होती

आपणास हे प्रकरण ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु मध्य प्रदेशात हे नवीन प्रकरण नाही. यापूर्वी भोपाळमध्येही 2019 मध्ये अशीच एक बाब समोर आली होती, जिथे लग्नाला सात वर्ष झालेल्या विवाहित महिलेने आपल्या पतीला घटस्फोट दिला होता जेणेकरुन ती आपल्या प्रियकरासोबत नवीन जीवन जगू शकेल.