वेगळ्या ‘विंध्य प्रदेश’ मागणीला ‘जोर’ ! ‘विरोध करणार्‍यांवर बहिष्कार टाकणार’, भाजपाच्या ‘या’ आमदारानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेगळ्या बुंदेलखंडानंतर आता विंध्य प्रदेश तयार करण्याच्या मागणीला जोर आला आहे. सतनामधील भाजपा आमदार नारायण त्रिपाठी यांनी रीवा, सिधी, सतना, सिंगरौली, जबलपूर, शहडोल यांना जोडून वेगळ्या विंध्य प्रदेशाची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी सीएम कमलनाथ पासून पीएम मोदींना पात्र लिहिले आहे. भाजपा आमदार यांचे म्हणणे आहे की भाजप आणि कॉंग्रेसच्या लोक प्रतिनिधींची इच्छा आहे की विंध्यला स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करावे आणि जो याचा विरोध करेल त्याच्यावर स्थानिक स्तरावर बहिष्कार टाकला जाईल.

विंध्यमहोत्सवमध्ये घेणार निर्णय

त्यांनी सांगितले की, विंध्य महोत्सवात येथील मागासलेपणा दूर करण्यासाठी नवीन प्रदेश निर्माण करण्याबाबत विचार केला जाईल. येणाऱ्या दोन महिन्यात या मागणीसाठी कार्यक्रम आखले जातील. तथापि, आमदार नारायण त्रिपाठी यांच्या मागणीवर सध्या तरी भाजपा नेत्यांनी मौन पत्करले आहे. काँग्रेस सरकार देखील या मागणीसाठी पाहिजे तितके उत्सुक दिसत नाही. विंध्य मधील मंत्री कमलेश्वर पटेल यांनी म्हटले की अजून राज्याच्या विकासासाठी बरेच काही करायचे बाकी आहे आणि अशातच या पद्धतीच्या मागणीला काही अर्थ नाही.

सर्वांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार

मंत्री पी सी शर्मा यांनी सांगितले की, सर्वांना आपली भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. या संबंधीचे निर्णय हे उच्च स्तरावर होत असतात. वास्तविक पाहता विंध्य प्रदेशची स्थापना १९४८ मध्ये झाली होती, ज्याची राजधानी रीवा होती. १९५६ मध्ये मध्य प्रदेशच्या स्थापनेत विंध्यचा राज्यात समावेश करण्यात आला होता, पण आता पुन्हा एकदा विंध्य प्रदेश बनविण्याच्या मागणीला जोर आला आहे.