करोडपती क्लार्क ! ‘बाबूगिरी’ करणार्‍याकडे 2.17 कोटींची रोकड अन् 8 किलो सोनं, ‘घबाड’ पाहून उडाली सर्वांचीच झोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये एफसीआय FCI (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या एका क्लार्कच्या घरावर छापा मारण्यात आला आहे. भ्रष्टाचार केलेला आरोप त्याच्यावर आहे. या क्लार्कच्या घरी मोठं घबाड सापडलं आहे. क्लार्कच्या घरात तब्बल २.१७ कोटी रुपये, ८ किलो सोनं आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. भ्रष्टाचार प्रकरणाच्या तक्रारी आल्यानंतर सीबीआयच्या एका टीमने ही कारवाई केली आहे. तो छोला परिसरात राहत असून सीबीआयच्या कारवाई सुरू आहे. सीबीआयकडे मीणाविरोधात लाचेच्या तक्रारी आल्या होत्या. तसेच त्याच्या घरातून भ्रष्टाचाराचे पुरावेही सापडले आहेत. किशोर मीरा मीणा असं या क्लार्कचं नाव आहे.

B.G. कोळसे-पाटलांचा सवाल; म्हणाले – ‘त्यावेळी संभाजी छत्रपतींनी संसदेत तोंड का उघडले नाही ?’

गुडगाव येथील एका सेक्युरिटी एजन्सीने भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. त्यानंतर किशोर मीणासह तीन लोकांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. त्यानंतर पुढची कारवाई करण्यात आली. मीणा याची चौकशी केली असता लाचेची रक्कम तो घरीच ठेवत असल्याचं उघड झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, मीणा हा सुरुवातीला एफसीआयमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी एफसीआयच्या FCI डिव्हिजनल मॅनेजरसह चौघांना अटक केली आहे. यातील तीन मॅनेजरच्या लाचेची रक्कम किशोर मीणा स्वत:कडेच ठेवत असल्याची माहितीही मिळाली आहे.

बड्या अधिकाऱ्यांसोबत भ्रष्टाचार करू लागल्याने त्याला क्लार्क करण्यात आलं होतं. सीबीआयने मीणाच्या घरातून २.१७ कोटी रुपये जप्त केले आहेत. सोबत नोटा मोजण्याची मशीनही जप्त केली आहे. त्यासोबतच ८ किलो सोनं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. गुडगावच्या सेक्युरिटी कंपनीने सीबीआयकडे भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. एफसीआयचे मॅनेजर दुसऱ्या कर्मचाऱ्यांशी हात मिळवणी करून उघडपणे लाच घेत आहेत, अशी तक्रार करण्यात आली होती. ही खबर मिळताच सीबीआयने जाळं पसरलं. सीबीआयने आरोपींना एका मंदिरात बोलावलं होतं. तिथं लाच घेताना आरोपींना रंगेहाथ पकण्यात आलं.

Also Read This : 

दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR

Video : पुण्यात नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक पोलिसानं दुचाकी थांबवली ! दुचाकीस्वारानं फरफटत नेल्यानं पोलिस हवालदार जखमी; व्हिडीओ CCTV मध्ये कैद

राज्यातील ‘या’ 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त; 15 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाढणार