फरार पत्रकार प्यारे मियाँवर आणखी 2 युवतींनी केला लैंगिक शोषणाचा आरोप, जाणून घ्या प्रकरण

भोपाळ : वृत्तसंस्था –  भोपाळमध्ये वर्तमानपत्र चालवणाऱ्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या प्यारे मियांचे कृत्य आता समोर येत आहे. या प्रकरणात आणखी दोन अल्पवयीन मुलींनी भोपाळ पोलिसांशी संपर्क साधला आहे आणि म्हटले आहे प्यारे मियां त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता.

हे प्रकरण समोर आल्यानंतर प्यारे मियां फरार आहे. भोपाळ पोलिसांनी त्याच्यावर ३० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. सोमवारी पोलिसांनी प्यारे मियांविरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात प्यारे मियांशिवाय त्याच्या २१ वर्षाच्या सेक्रेटरीचेही नाव आहे. त्याच्यावर मुलींना जाळ्यात अडकवल्याचा आरोप आहे.

आतापर्यंत ७ अल्पवयीन मुलींनी केली आहे तक्रार

आतापर्यंत ७ अल्पवयीन मुलींनी मियांविरोधात बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी आरोप केला आहे की, प्यारे मियां भोपाळमध्ये चाइल्ड सेक्स रॅकेट चालवत होता. पोलिसांनी प्यारे मियांच्या गुन्ह्यांचा तपशीलवार सांगत म्हटले की, “यातील बहुतांश अल्पवयीन मुली गरीब कुटुंबातील होत्या. प्यारे मियांने या मुलींना त्यांचा खर्च भागवणे व लग्नाचा खर्च देण्याचे आश्वासन दिले होते. तो मुलींना यासाठी मजबूर करत असे कि त्यांनी त्याला अब्बू म्हणावे.”

मान्यता प्राप्त पत्रकार होता प्यारे मियां, सरकारी बंगलाही देण्यात आला होता

एमपीचे सीएम शिवराजसिंह चौहान स्वत: या प्रकरणात लक्ष घालत आहेत. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्यारे मियांच्या वर्तमानपत्राची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पत्रकार म्हणून प्यारे मियांची अधिकृत मान्यता रद्द केली गेली आहे. आता पोलिसांनी त्याला देण्यात आलेला सरकारी बंगलाही मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

प्यारे मियांच्या लग्न सभागृहावर चढवला बुलडोझर

भोपाळ महानगरपालिकेने सोमवारी सायंकाळी प्यारे मियांचे लग्न सभागृह तोडले. महापालिकेच्या म्हणण्यानुसार, त्याचे बांधकाम परवानगीशिवाय बांधण्यात आले होते. प्यारे मियांच्या इतर मालमत्तांनाही पालिकेने नोटिस पाठवली आहे.

शनिवारी-रविवारी रात्री एमपीची राजधानी भोपाळमध्ये पोलिसांना पाच अल्पवयीन मुली मद्यधुंद अवस्थेत सापडल्या होत्या. त्यांची चौकशी केली असता त्यांनी प्यारे मियांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता.