COVID-19 : मध्य प्रदेशच्या 4 बड्या IAS अधिकाऱ्यांनी स्वतःला केलं ‘क्वारंटाइन’ !

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. भोपाळमध्ये दोन आयएएस अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी पॉजिटीव्ह आढळल्यानंतर आता आणखी चार आयएएस अधिकाऱ्यांनी स्वतःला क्वारंटाइन ठेवले आहे. यानंतर आता चार अधिकारी प्रशासन ऍकॅडमीच्या गेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाइनसाठी गेले आहेत.

प्रशासन ऍकॅडमीच्या गेस्ट हाऊसमध्ये केले गेले क्वारंटाइन
आयएएस अधिकारी जे विजय कुमार आणि पल्लवी जैन गोविल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यानंतर कोरोना विषाणूबद्दल अधिकाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. यामुळेच चार अधिकारी अनुराग जैन अतिरिक्त मुख्य सचिव वित्त, अरविंद दुबे मुख्य सचिव कार्यालयाचे उपसचिव, सुदाम खांडे मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य रस्ते प्राधिकरण, अभिषेक दुबे अतिरिक्त संचालक आरोग्य विभाग हे क्वारंटाइनसाठी गेले आहेत. या अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच विनंती केली कि त्यांना क्वारंटाइन ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रशासकीय ऍकॅडमीच्या गेस्ट हाऊसमध्ये चारही अधिकाऱ्यांना क्वारंटाइन ठेवले गेले. भोपाळमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी सतत कोरोनाग्रस्त आढळत आहेत. यानंतर अधिकाऱ्यांचे नमुने सातत्याने घेतले जात आहेत.

डॉक्टर रुबी खान देखील पॉजिटीव्ह
कोविड -१९ ची लक्षणे डॉक्टर रुबी खानमध्ये आढळली. त्यांचा चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला. प्रशासकीय ऍकॅडमीच्या वसतिगृहात रूबी खान यांनी स्वत:ला क्वारंटाइन ठेवले होते. त्या दवाखान्यात जायला तयार नव्हत्या. रुबी अधिकाऱ्यांशी सहमत नव्हत्या. आता रुबी खान यांना पूर्ण सुविधा असलेल्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यासह डॉ. वीणा सिन्हा देखील प्रशासकीय ऍकॅडमीमध्ये क्वारंटाइन होत्या. यानंतर त्यांनाही रुग्णालयात हलवण्यात आले.

प्रशासन ऍकॅडमीला केले गेले सॅनिटाइज
प्रशासकीय ऍकॅडमीच्या वसतिगृहात डॉ.रुबी खान आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक वीणा सिन्हा क्वारंटाइन होत्या. त्यानंतर वसतिगृहे आणि प्रशासन ऍकॅडमी स्वच्छ केली गेली. केवळ सॅनिटायझेशन केल्यानंतर प्रशासकीय ऍकॅडमीच्या गेस्ट हाऊसमध्ये या चार अधिकाऱ्यांना क्वारंटाइन ठेवले गेले आहे.