पती IAS ची करतोय तयारी, कितीही ‘टॉप-टीप’ राहिलं तरी ‘ढुंकून’ बघत नाही, पत्नीनं मागितला घटस्फोट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आजकाल आपल्या आजूबाजूला नव-नवीन घटना ऐकायला मिळत असतात. अशीच एक घटना मध्यप्रदेशमधील भोपाळ शहरात घडली आहे. एका महिलेने आपण कितीही सजलो-धजलो तरी आपला पती आपल्याकडे लक्षच देत नाही, असा आरोप करत घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या महिलेचे असे म्हणणे आहे कि, आपला पती संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची (UPSC) ची तयारी करत असल्यामुळे तो दिवसभर घरात अभ्यास करत बसलेला असतो. त्यामुळे मी कितीही सजले-धजले तरी तो आपल्याकडे लक्षच देत नाही. कधी आपले कौतुक सुद्धा करत नाही. त्याच ठिकाणी पतीचे म्हणणे आले कि, तो IAS झाल्याशिवाय आपल्या पत्नीकडे ध्यान देऊ शकणार नाही.

काय आहे प्रकरण
एका वर्तमान पत्रात छापून आलेल्या बातमीनुसार, घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज करणारी महिला हि भोपाळ मधील कटरा या भागात राहते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात सुरु असलेल्या समुपदेशनाच्या वेळी महिलेने खालील गोष्टींचा उहापोह केला. पत्नीने सांगितले कि, ती मूळची मुंबईची राहणारी आहे. इथे भोपाळ मध्ये तिचे कोणीही नातेवाईक नाहीत. त्यामुळे इकडे आपल्याला करमत नाही. पत्नीने पुढे असे सांगितले कि, सासरमध्ये केवळ दोनच महिने राहिल्यानंतर मी माझ्या माहेरला गेले होते. त्या दरम्यान पतीने आपल्याला एकही फोन केला नाही. तो आपल्याकडे लक्षच देत नाही अशी तक्रार केली.

समुपदेशना दरम्यान पत्नी म्हणाली, अमचे लग्न होऊन दोन वर्ष झाले आहेत. या दोन वर्षांमध्ये आपल्या पतीने आपल्याला एकदाही बाहेर फिरायला नेले नाही. अशा परिस्थितीत आपल्याला पत्नी सोबत रहायाचे नाही. या प्रकरणात पत्नीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. समुपदेशन केंद्रातील समुपदेशकांचे म्हणणे आहे कि, या दाम्पत्यामध्ये असलेले नाते तुटू नये म्हणून त्यांचे समुपदेशन करणे सुरु आहे.

IAS बनणे हेच माझे स्वप्न
समुपदेशनादरम्यान पती ने सांगितले कि, माझे स्वप्न हे प्रशासकीय अधिकारी (IAS) बनणे आहे. पतीने पीएचडी केली आहे. तसेच तो कोचिंग चालवतो. सोबतच यूपीएससीची तयारी सुद्धा करत आहे. पतीने सांगितले कि, तो आत्तापर्यंत दोन वेळेस संघ लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पास झाला होता. परंतु मुख्य परीक्षेतून बाहेर पडला आहे. पतीचे असे म्हणणे आहे कि, जोपर्यंत तो (UPSC) ची परीक्षा पास होत नाही, तोपर्यंत महिलेला पत्नीचा दर्जा देऊ शकणार नाही. पतीने सांगितले कि, त्याला मुळात लग्न करायचे नव्हते. परंतु आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याकारणाने लग्न करण्याचा त्याच्यावर मोठा दबाव होता. समुपदेशना दरम्यान नूरन्निशा खान या समुपदेशकाने दाम्पत्याने घटस्फोट घेऊ नये, तसेच पत्नीने आपल्या पतीला साथ द्यावी असे समजावण्याचा प्रयत्न केला.

आरोग्यविषयक वृत्त –