भोपाळच्या तलावात पलटली IPS अधिकार्‍यांची नाव, DGP च्या पत्नीचा देखील समावेश

मध्यप्रदेश (भोपाळ) : वृत्तसंस्था – आयपीएस सर्व्हिसच्या मीट दरम्यान, भोपाळच्या एका मोठ्या तलावात बोट पलटी झाली. बोटीत काही आयपीएस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. मध्य प्रदेशचे डीजीपी विजय कुमार सिंह यांची पत्नी देखील या बोटीमध्ये हजर होत्या. वॉटर स्पोर्ट्स दरम्यान ही घटना घडली. जवळपास उपस्थित असलेल्या इतर बोटींच्या मदतीने सर्व लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

पोलिस वेलफेयरचे एडीजी विजय कटारिया म्हणाले की, बोटीतील सर्व लोकांनी लाइफ जॅकेट घातले होते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रत्येक वेळी आयएएस आणि आयपीएस मीट मध्ये अधिकारी वॉटर स्पोर्ट्समध्ये भाग घेत असतात, ज्यामध्ये लाइफ जॅकेट्स आणि सेफ्टी बोट्स सुरक्षेसाठी तैनात असतात.

आयपीएस मीटच्या पहिल्या दिवशी क्रिकेट मॅच
भोपाळमध्ये आयपीएस मीट २०२० सुरू आहे. या पहिल्या दिवशी पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत मज्जा मस्ती केली. पहिल्याच दिवशी पहाटे मोतीलाल नेहरू स्टेडियम येथे आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले होते. ही मॅच डीजीपी व्हीके सिंह आणि एडीजी डी श्रीनिवास राव यांच्या टीममध्ये खेळली गेली. या मॅचमध्ये आयजी योगेश चौधरी ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले.

जोरदार नाचले आयपीएस अधिकारी
यानंतर, एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की पोलिसांनी आजपर्यंत लोकांना नाचवतांना पाहिले असेल. पण नाचतांना पहिल्यांदाच बघितले असेल. त्यावेळी राज्यभरातील निवडक आयपीएस अधिकाऱ्यांनी ग्रुप डान्स केला. बेस्ट डान्स मूव्हजसाठी अधिकाऱ्यांचा गौरवही करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रम विजेते

पहिला- जबलपूर विभाग

द्वितीय- भोपाळ विभाग

तिसरा- इंदूर-उज्जैन विभाग

चौथा – ग्वालियर-चंबळ

चार वेगवेगळ्या विभागाच्या टीम
आयपीएस सर्व्हिस मीट २०२० साठी चार वेगवेगळ्या विभागाच्या टीम्स तयार करण्यात आल्या आहेत, माळवा विभाग (उज्जैन, इंदूर), महाकौशल विभाग (रीवा, जबलपूर आणि सागर), चंबळ विभाग (ग्वालियर-चंबळ), भोपाळ विभाग (भोपाळ, पीएचक्यू आणि होशंगाबाद) आहेत.