COVID-19 : भोपाळमधील ‘हा’ परिसर बनला ‘कोरोना’चा ‘डेथ झोन’, इथं सर्वाधिक मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या जहांगीराबाद परिसराचे रूपांतर ‘कोरोना डेथ झोन’ मध्ये झाले आहे. येथे सर्वात जास्त कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहे. भोपाळमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृतांची संख्या या भागात सर्वाधिक आहे. येथे कोरोना संसर्गामुळे 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. परिसरातील अहिर मोहल्ला पूर्णपणे कोरोनाच्या घेऱ्यात आला आहे. जहांगीराबाद परिसरामध्ये झपाट्याने होणार्‍या संसर्गाने हा संपूर्ण परिसर व्यापला आहे. शहरातील इतर भागाच्या तुलनेत येथे सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे समोर येत आहेत. आतापर्यंत 191 कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत.

जहांगीराबाद परिसराच्या अहिर भागात सर्वाधिक संसर्ग झाला आहे. यानंतर जहांगीराबाद बाजारातही सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. या दोन भागाबरोबरच बडवाली मशिद परिसर, जिन्सी स्क्वेअर आणि महफूज बिल्डिंगमध्येही सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आकडेवारीवर नजर टाकली तर, अहिर मोहल्ला 76, जहांगीराबाद बाजार 31, बडवाली मशिद क्षेत्र 18, महफूज बिल्डिंग 16 आणि जिन्सी चौराहामध्ये 13 कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 7 दिवसांत सुमारे 80 प्रकरणे नोंदली गेली आहेत.

दररोज 300 हून अधिक नमुने
शहरातील इतर भागाच्या तुलनेत जहांगीराबाद परिसरामध्ये सर्वाधिक नमुने घेण्यात आले आहेत. येथे तैनात महसूल विभागाचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या भागात दररोज 300 हून अधिक नमुने घेतले जात आहेत. प्रशासनाने येथे पूर्ण ताकद दिली आहे. वेगाने होणार्‍या संसर्गामुळे लोकांनाही दुसर्‍या ठिकाणी हलविण्यात येत आहे. आरोग्य विभागाची 20 हून अधिक विविध पथके येथे दररोज नमुने घेतात. तथापि, अधिकाऱ्यांचे असेही म्हणणे आहे की, परिसरातील लोक स्कॅनिंग करण्यात आणि नमुने देण्यास सहकार्य करीत नाहीत, त्यामुळे घाबरू नका, असे आवाहन प्रशासनाने लोकांना केले आहे. या कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी, लोक जास्तीत जास्त स्कॅनिंग आणि नमुन्यासाठी पुढे आले आहे.