Coronavirus : ‘कोरोना’चा धसका, डॉक्टर थेट मेंटल हॉस्पीटलमध्ये

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचं संक्रमण शारीरिक आरोग्यासोबतच मानसिकतेवरही परिणाम करत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे चक्क एका डॉक्टरलाच मानसिक स्वास्थ्य केंद्रात दाखल करावं लागल्याचा प्रकार भोपाळमध्ये समोर आला आहे. या डॉक्टरला कोरोनाची लागण तर झाली नाही. परंतु त्याचा मानसिक धसका घेतल्याने त्याला भयंकर फोबिया झाला. त्यामुळे त्याला मानसिक स्वास्थ्य केंद्राची मदत घ्यावी लागली आहे.

भोपाळमधील संबंधित डॉक्टरने कोरोनाचा मानसिकरित्या धसकाच घेतला आहे. त्याला कोरोनाची लागण झालेली नाही.परंतु या मेडीकल प्रोफेशनल डॉक्टरने कोरोनाची मानसिक धास्तीच खुप घेतली.त्यामुळे त्याचा फोबिया प्रचंड वाढला. त्यांनी कोरोनाची धास्ती घेतल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ मानसिक रोग तज्ञांची मदत घेतली. अनेक चाचण्या पार पडल्या. एमपी मेंटल हेल्थ अथॉरिटीचे सचिव आर एन साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित डॉक्टरमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत परंतु कोरोनाच्या भीतीने त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे.