आश्चर्यम् ! ज्या कोरोनाबाधित रुग्णांना गुजरातची बनावट रेमडेसिव्हिर टोचली त्यातील 90 % रुग्ण बरे

भोपाळ : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, आरोग्य सेवा-सुविधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यातच रेमडेसिव्हिर इंजेक्शन, व्हेंटिलेटर/ऑक्सिजन बेड्स, कोरोना प्रतिंबधक लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यावरूनच आता महत्वाची बातमी समोर आली आहे.

इंदूर आणि जबलपूरमध्ये ज्या कोरोनाबाधित रुग्णांना गुजरातमधून आलेले बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन लावले होते. त्यापैकी 90 टक्के रुग्णांचे फुफ्फुसाचे इन्फेक्शन ठीक झाले. पोलिसांनी याबाबतचा खुलासा केला आहे. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले, की इंदूरमध्ये ज्या रुग्णांना बनावट रेमडेसिव्हिर दिले गेले. त्यापैकी दहा रुग्णांचा मृत्यू झाला. तर 100 रुग्ण बरे झाले आहेत. इन्फेक्शनमध्ये फक्त ग्लुकोज आणि मीठ होते. मात्र, ज्या रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाला त्यांच्या शरीरातील तपासणी झाली नाही. कारण त्या सर्वांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

60 रुग्णांनी घेतले बनावट इंजेक्शन

गुजरात पोलिसांनी सिटी रुग्णालयाचा व्यवस्थापक देवेश चौरसिया याला अटक केली आहे. देवेश चौरसिया याने सांगितले की, 60 रुग्णांना रुग्णालयात बनावट इंजेक्शन लावण्यात आले आहेत. संपूर्ण प्रकरणात पोलिस आणखी काही लोकांना अटक करून चौकशी करणार आहे. त्याने याबाबत कोणताही खुलासा केला नाही.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेता अटकेत

इंदूरच्या विजयनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी 4 आरोपींना पकडण्यात आले होते. त्यातील एक आरोपी भोपाळमधील आहे तर एक आरोपी सांवेर येथील आहे. तर इतर दोन आरोपींना शहरातून अटक करण्यात आली होती. आत्तापर्यंत पोलिसांनी डझनभर आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये एका काँग्रेस नेत्याला अटक केली आहे.