MP पोलिसांनी चिटफंड कंपन्यांवर आवळला फास, 5 लाख लोकांची बुडालेली 825 कोटी रूपयांची रक्कम दिली

भोपाळ : मध्य प्रदेशात चिटफंड कंपन्यांवर (chit fund companies scam )
पोलिसांनी फास आवळण्यास सुरूवात केली आहे. मध्य प्रदेश पोलीसांच्या सक्तीमुळे ज्या लोकांचे पैसे या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टच्या नावाखाली बुडाले होते, त्यांना पैसे परत देण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. पोलिसांच्या विशेष अभियानांतर्गत आतापर्यंत 5 लाख लोकांना त्यांची बुडालेली 825 कोटी रूपयांची रक्कम परत करण्यात आली आहे. हे अभियान सातत्याने सुरू आहे.

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी मध्य प्रदेश पोलिसांचे चिटफंड कंपन्यांच्या बेकायदेशीर हालचाली रोखल्याबद्दल अभिनंदन केले. राज्यात सुमारे पाच लाख नागरिकांना त्यांची बुडालेली रक्कम परत मिळाली आहे. आतापर्यंत एकुण 825 कोटी रुपयांची रक्कम गुंतवणुकदारांना मिळाली आहे. तर सहारा इंडियाद्वारे मध्य प्रदेशमध्ये 1 मेपासून 31 ऑक्टोबर 2020 च्या मध्यापर्यंत 618 कोटी रुपये करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांचे यासाठी अभिनंदन केले.

यांच्यावर आवळला फास…

जिल्हा रीवा : साई प्रकाश प्रॉपर्टी लिमिटेडची 42 एकर जमीन गोठवण्याचे आदेश संमत.
जिल्हा मंदसौर : हलधन रियल्टी इंडिया लिमिटेडची 1.5 कोटींची संपत्ती गोठवण्याचे आदेश जारी.
जिल्हा नीमच : फ्यूचर मेकर लाइफ केयर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे रुपये 5.5 कोटी फ्रीज.
जिल्हा बडवानी : बीएन गोल्डई प्रा.लि.कं., आर.के.आर कंपनी, गुरू साई रियल स्टेट कंपनीची एकुण रुपये 5 कोटी 47 लाख किंमतीची संपत्ती गोठवण्याचे आदेश जारी.
जिल्हा सागर : सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 40.41 हेक्टेयर भूमी गोठवण्याचे आदेश जारी.
जिल्हा ग्वाल्हेर : सक्षम डेयरीज, सन इंडिया प्रा.लि.कं. ची रुपये 4 कोटी किमतीची संपत्ती गोठवण्याचे आदेश जारी.