ज्योतिरादित्यांच्या भाजपप्रवेशामुळं माजी मुख्यमंत्र्यांना ‘आनंद’, चौहान म्हणाले – ‘स्वागत है महाराज, साथ है शिवराज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगामध्ये सतत बदल होत आहेत. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पत्रकार परिषद घेत कमलनाथ सरकारवर जोरदार हल्ला चढविला असून ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कौतुक केले आहे. यासह शिवराज चौहान यांनी ‘आमचे नेते शिवराज, माफ करा महाराज’ अशा भाजपच्या नारेबाजीचे स्पष्टीकरणही दिले. ते म्हणाले की, आता महाराज आणि शिवराज एक आहेत. दोघेही भाजपमध्ये आहेत. यासह शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट केले, ‘स्वागत आहे महाराज, सोबत आहेत शिवराज.’

शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारवर हल्ला चढवित म्हंटले कि, त्यांनी मध्य प्रदेशला नष्ट केले आहे. जेव्हा सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, ‘हा भाजप आणि माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप आनंदाचा दिवस आहे. आज मला राजमाता सिंधिया यांची आठवण येते. ज्योतिरादित्य सिंधिया आता भाजप कुटुंबातील सदस्य बनले आहेत. त्याच्यासाठी राजकारण हे लोकांची सेवा करण्याचे एक साधन आहे. हा माझ्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

‘पार्टी मजबूत होईल’
सिंधिया भाजपमध्ये सामील झाल्याबद्दल शिवराज चौहान म्हणाले की, ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्ष आणखी मजबूत होईल. त्यांनी भाजपमध्ये सिंधिया यांचे स्वागत केले आहे. दरम्यान, शिवराजसिंह चौहान जेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया त्यांच्या सरकारच्या धोरणांबद्दल खूप टीका करायचे, परंतु आता ते भाजपचे सदस्यदेखील झाले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले. यावेळी सिंधिया म्हणाले की, कॉंग्रेस आता पहिल्यासारखी राहिली नाही.