मुंबई-ठाण्यासह राज्यातील 8 तर देशातील 46 शहरांमधील ध्वनी प्रदूषणाला ‘ब्रेक’, NGT नं उचललं ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल तर्फे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने सर्व राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण बोर्ड आणि पाेल्युशन कंट्रोल कमेटी यांना ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठीही प्लॅन तयार करण्यासाठी सांगितले आहे. हा प्लॅन मध्ये प्रदेशच्या भोपाळ, इंदोर, ग्वालियर आणि जबलपुर सोडून देशातील ४६ शहरांसाठी तयार करण्यात येणार आहे.

या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, कल्याण, डोंबवली, औरंगाबाद, नागपुर या शहरांचा समावेश आहे. तर उत्तर प्रदेशमधील आग्रा, प्रयागराज, गाजियाबाद, कानपुर, लखनऊ, मेरठ, वाराणसी या शहरांचा समावेश आहे. या शहरांसाठी तयार केलेला प्लॅन ३१ नोव्हेंबरपर्यंत लागू करण्यात येणार आहे.

सीपीसी बोर्डाने सर्व राज्यांना अपल्या शहरांच्या प्लॅनिंग मध्ये वायु प्रदुषण असणाऱ्या भागांना सामावून घेण्यास सांगितले आहे. तसंच त्या भागातील ध्वनी प्रदूषणाची काय स्थिती आहे याचा रिपोर्टही द्यावा लागणार आहे. या यादीत असलेल्या शहरांना आपल्या सर्वाधिक वायु प्रदूषित भागांना घेत त्याअनुसरून मॅपिंग करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, वायु प्रदूषणात मुख्यतः ध्वनी प्रदूषण हे प्रमुख कारण मानले जात आहे. याचा उल्लेख प्रिवेंशन आणि कंट्रोल ऑफ पोल्यूशन अ‍ॅक्ट-१९८१ मध्येही करण्यात आला आहे. त्यामुळेच एनजीटीने देशातील प्रदूषित शहरांमधील वातावरण ठिक करण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त