PM मोदींसह पोस्टरवर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा फोटो, मध्य प्रदेशातील राजकारण तापलं

भोपाळ : वृत्तसंस्था – शेतकरी कर्ज माफी आणि राज्यातील पूर्वपरिस्थितीवरून काँग्रेसचे नेते व माजी सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता ते भाजपच्या पोस्टरवर झळकले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशमधील वातावरण तापले आहे.

मध्य प्रदेशमधील भिंड येथील भाजपाच्या पोस्टरवर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मोठा फोटो दिसत आहे. या पोस्टरवर कलम ३७० हटवण्याचा निर्णयाचे समर्थन केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. या पोस्टरवर भारताच्या नकाशात भारतमाता दाखवली असून सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचे देखील फोटो आहेत. भाजपाच्या जिल्हा समन्वयकाने हा पोस्टर लावला आहे.

काय म्हणाले सिंधिया –

कॉंग्रेसचे माजी खासदार ज्योतिरादित्य सिंधिया गुरुवारी अटेर भागात पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी येथे कार्यकर्त्यांशी बोलून पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पूरग्रस्तांना संबोधित करतांना सिंधिया यांनी कमलनाथ सरकारला सल्ला दिला. ते म्हणाले, ‘मी या खेड्यातील लोकांना सांगितले आहे की या संकटाच्या वेळी मी त्यांच्या पाठीशी उभा आहे, पण सरकारलाही लोकांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. इथल्या बर्‍याच खेड्यांमध्ये समुद्रात एखादा लहान बेट असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या खेड्यांमध्ये 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी. संकटाच्या वेळी तुमच्याबरोबर खांदा लावून उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे.

शिवराज सिंह यांनी प्रतिक्रिया दिली –

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विधानावरून काँग्रेसला घरचा आहेर मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शिवराज यांनी सिंधिया यांच्या निवेदनासह ट्विट केले की, ‘ना शिवराज किंवा ना जनता , आता फक्त तुमचे लोक तुम्हाला आरसा दाखवत आहेत आणि सांगत आहेत की कमलनाथजी आपले सरकार अजूनही जागे होणार नाही का ? शेतकर्‍यांचे अश्रू कोरडे झाले, पण त्यांच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत! जर तुम्हाला जर थोडी लाज वाटत असेल तर कर्जमाफीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या! ‘

सिंधिया यांच्या विधानानंतर, भाजपच्या प्रतिसादानंतर आणि भाजपाच्या जिल्हा समन्वयकाने लावलेल्या पोस्टरवरच झळकल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

 

visit : Policenama.com