मोठ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, TMC चा अध्यक्षच चालवत होता ‘गोरख धंदा’, 13 जणांना अटक

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमधील बरखेडी येथे एका डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी ४ महिलांसह १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात तृणमुल काँग्रेसचा मध्य प्रदेशचे अध्यक्ष सचिन चौहान याचाही समावेश आहे.

भोपाल में क्राइम ब्रांच ने छापा मारकर सेक्स रैकेट का भंडाफोड़ किया है।

भोपाळमधील अशोका विहार कॉलनीमध्ये एका डॉक्टरच्या क्लिनिकमधून सेक्स रॅकेट चालविले जात असल्याची खबर भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी येथील क्लिनिकवर छापा टाकला. त्यात १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तृणमुल काँग्रेसचा मध्य प्रदेशचा अध्यक्ष सचिन चौहान हाच हे सेक्स रॅकेट चालवित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

MP में सेक्स रैकेट: टीएमसी के प्रदेश अध्यक्ष सचिन चौहान और पूर्व सरंपच रंगेहाथों गिरफ्तार