भाजपने माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – `लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी त्यांनी आपली गृहमंत्रालयाची जबाबदारी सांभाळून अध्यपदाचे देखील कामकाज ते योग्य पद्धतीने हाताळत आहेत. त्यामुळे भाजप मधील मोठ्या नेत्यांवर मोठी जबाबदारी दिली जात असून भाजप नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवराज सिंग चौहान यांच्यावर भाजप सदस्य नोंदणी अभियानाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे अभियान आता त्याच्या नेतृत्वाखाली चालवले जाईल. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्यावर हि जबाबदारी दिली आहे. दिल्लीत आज झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राजकीय भविष्य होते धोक्यात

२०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सलग १५ वर्ष असलेली सत्ता गमावल्यानंतर शिवराज सिंग चौहान यांच्या राजकीय भविष्याविषयी शंका व्यक्त केली जात होती. त्यांना केंद्रात घेउन्नतीच्यावर एखादी मोठी जबाबदारी दिली जाण्याची देखील चर्चा होत होती. मात्र अजूनपर्यंत तसे काही घडले नव्हते. त्यानांतर त्यांना पक्षाचे उपाध्यक्षपद देखील दिले गेले होते. मात्र या आज दिलेल्या जबाबदारीने या सगळ्या चर्चा बंद झाल्या आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर या सगळ्यात मध्यप्रदेशला झुकते माप दिले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात देखील प्रदेशातील खासदारांकडे महत्वाची खाती देण्यात आली आहेत.

सिने जगत –

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका धक्‍कादायक वळणावर ; ‘चालतय की’ म्हणणारा राणा’दा’ ची ‘एक्झिट’

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

#Video : ‘हे’ बॉलिवूडचे सुपरस्टार मिडिया समोर लपवितात ‘चेहरा’

शाहरूख खानची मुलगी सुहाना आता ‘या’ फिल्म मध्ये काम करणार