कॉन्स्टेबलला बायकोची धमकी, म्हणली – ‘माझ्या भावाच्या लग्नात आला नाहीत तर परिणाम चांगला होणार नाही’

भोपाळ : वृत्तसंस्था – कोरोना काळात सध्या लग्नसराई सुरू आहे. लग्न सोहळ्याशी संबंधीत एक अर्ज सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात वायरल होत आहे. हा अर्ज मध्य प्रदेश पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलचा आहे, जो आपल्या वरिष्ठांना लिहिला आहे.

वायरल होत असलेल्या या अर्जाची विशेष बाब ही आहे की, यामध्ये एमपी पोलीसच्या या कॉन्स्टेबलने आपल्या पत्नीकडून मिळालेल्या धमकीचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिले आहे की, तो लग्नाला गेला नाही तर परिणाम चांगले होणार नसल्याची धमकी पत्नीने दिली आहे.

संपूर्ण प्रकरण असे आहे की, भोपाळ ट्रॅफिक पोलीसमध्ये कॉन्स्टेबल असलेल्या दिलीप कुमार यांच्या मेहुण्याचे 11 डिसेंबरला लग्न आहे. त्यांनी पाच दिवसांच्या सुटीसाठी अर्ज केला आहे. त्यांनी आपल्या अर्जात लिहिले आहे की, मी भोपाळ वाहतूक ठाण्यात कार्यरत आहे. माझ्या सख्ख्या मेहुण्याच्या लग्नासाठी 11 डिसेंबरला जायचे आहे. या लग्नाला मी जाणे अति आवश्यक आहे. श्रीमान आपण विनंती आहे की मला 5 दिवसांची सुटी प्रदान करण्याची कृपा करावी.

भोपाळ पोलीस दलातील या कॉन्स्टेबलच्या अर्जात विशेष गोष्ट अर्जाच्या खाली लिहिलेली नोट आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, ’अर्जदाराच्या पत्नीने स्पष्ट म्हटले आहे की, जर भावाच्या लग्नात आले नाहीत, तर परिणाम चांगला होणार नाही.’