आईनं PUBG खेळण्यासाठी ‘नेट’ पॅक ‘रिचार्ज’ करण्यास दिला ‘नकार’, ITI च्या तरुणानं फाशी घेऊन दिला ‘जीव’

भोपाळ : वृत्तसंस्था – PUBG मोबाईल गेममुळे अनेक तरूणांना वेड लावलं आहे. या गेममुळे अनेक मुलांवर परिणाम झाला आहे तर काही मुलांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ मध्ये घडली आहे. एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थ्याला पब्जी गेम खेळण्याची सवय लागली होती. जेव्हा आईने पब्जी खेळण्यासाठी इंटरनेट पॅक रिचार्ज करण्यास नकार दिला तेव्हा या मुलाने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवलं. मयत मुलगा हा आयटीआयचा विद्यार्थी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बागसेव्हानिया भागातील आहे. या ठिकाणा राहणाऱ्या नीरज कुशावाह याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. नीरज हा आयटआयचा कोर्स करत होता. पोलिसांनी सांगितले की, नीरजचे वडील विरेश कुशावाह हे आपला लहान मुलगा सुरजसोबत बाग मुघलियामध्ये बांधकाम सुरु असलेल्या घरी गेले होते. त्यावेळी घरामध्ये मुलगा नीरज आणि आई दोघेच होते.

नीरजची आई लहान मुलगा आणि वडीलांसाठी जेवणाचा डबा घेऊन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी गेली. दुपारी सुरज जेव्हा घरी आला त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने दरवाजा वाजवला मात्र आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता नीरजने फाशी घेतल्याचे दिसले. त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने नीरजला खाली उतरवून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत नीरजचा मृत्यू झाला होता.

नीरजचे आईसोबत भांडण
मृत नीरजच्या आई सविता यांनी पोलिसांना सांगितले की, नीरज याला पब्जी खळण्याची सवय होती. पब्जी खेळण्यासाठी त्याने 3 महिन्याचे इंटरनेट पॅक रिचार्ज करण्याचा हट्ट धरला होता. तेव्हा त्यांनी रिचार्ज करण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांच्या या कारणावरून भांडण झाले होते. आईला हे माहित नव्हते की नीरज या कारणावरून एवढा मोठं पाऊल उचलेल. नातेवाईकांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे नीरज रात्री दोन वाजेपर्यत पब्जी गेम खेळत होता. दरम्यान पोलीस मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत आहेत.