Bhor Assembly Election 2024 | भोर विधानसभा मतदारसंघ : तुम्हीच उमेदवार आहात हे लक्षात ठेवून मतदान करा : महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर

Bhor Assembly Election 2024 | Bhor Assembly Constituency: Vote remembering that you are the candidate: NCP candidate Shankar Mandekar

भोर : Bhor Assembly Election 2024 | “मी उमेदवार नसून सर्वसामान्य जनता उमेदवार आहे हेच लक्षात ठेवून मतदान करा,” अशी भावनिक साद महायुतीचे भोर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी गाव भेटी दरम्यान मतदारांना घातली.

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर आज भोर तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत माजी आमदार शरद ढमाले, माजी उपसभापती रणजित दादा शिवतारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दशरथ जाधव, आणि आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड यांसारखे मान्यवर सहभागी झाले होते.

आंबेघर, चिखलावडे, नाटंबी, कारंजे, कारंजेवाडी, पानव्हळ, नाझरे, कर्णावड, रावडी, चिखलगाव, टिटेघर, कोर्ले, वडतुंबी, म्हाकोशी, आंबवडे, घोरपडेवाडी, सांघवी, कारी, अंगसुळे, भावेखल, आपटी, नांदगाव, वाठार हिमा, पिसावरे या गावांना मांडेकर यांनी भेट दिली. या दौऱ्यात त्यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला.

गाव भेटी दरम्यान मांडेकर म्हणाले, “पुढील पाच वर्षांत तालुक्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवण्याचे माझे वचन आहे. मतदारसंघाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची खात्री मी देतो.” स्थानिक युवकांना रोजगारनिर्मितीच्या संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर