मुळशी : पोलीसनामा ऑनलाईन – Bhor Assembly Election 2024 | तालुक्याच्या विकासासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन एकजुटीने काम करुयात, असे आवाहन महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोर विधानसभेचे उमेदवार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी केले.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर हे गावभेट दौरा करत आहेत. आज मांडेकरांनी कासारसाई गावात भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे मोठ्या उत्साहात उस्फुर्त स्वागत केले.
ग्रामस्थांशी संवाद साधताना शंकर मांडेकर म्हणाले की, “माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आहे. मुळशीचा स्वाभिमान जागवण्याची ही वेळ आहे. मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करुयात. तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याची संधी मला द्यावी.
गेल्या पंधरा वर्षांपासून मुळशी मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना व्यक्त करताना ग्रामस्थांनी तालुक्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प केला. या प्रसंगी गावकऱ्यांनी सामाजिक व विकासात्मक दृष्टीकोनातून सातत्याने घडत असलेल्या कामांचे कौतुक केले आणि असेच काम पुढेही सुरु राहावे, तसेच शेती आणि ग्रामीण प्रगतीमध्ये सकारात्मक बदल होत राहावे, स्थानिक विकासासाठी एकजुटीने कार्यरत राहू असा विश्वास दिला.
या भेटी दरम्यान संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बावकर, माजी सरपंच बाळासाहेब शितोळे,माजी सरपंच बाळासाहेब भिंताडे ,माजी सरपंच युवराज कलाटे ,माजी सरपंच आनंद लाटे,शिवसेनेचे नेते माजी सरपंच माऊली आबा केमस, उपसरपंच सागर शितोळे,माजी उपसरपंच स्वप्निल केमसे ,ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ शिखरे,मुळशी तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष भगवान शेठ कुंभार, माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास शितोळे, माजी उपसरपंच माणिकराव पवळे ,पोलीस पाटील किरण सपकाळ ,रोहिदास शितोळे ,अशोक जाधव ,विश्व शितोळे ,हनुमंत शेडगे ,शांताराम पवळे, विजय पवळे ,उदय शितोळे, कैलास शितोळे, पै बारकू अण्णा शेडगे, अंकुश शिखरे, चेअरमन दादासाहेब शितोळे, हनुमंत बावकर ,रवींद्र शितोळे ,संजय जरे ,युवराज, किरवे ,राजेंद्र किरवे ,पांडूरंग कुंभार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.