Bhor Assembly Election 2024 | सत्ता असताना चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था ही उभारता आल्या नाहीत हे कसले कर्तृत्ववान आमदार? महायुतीच्या शंकर मांडेकरांची संग्राम थोपटेंवर टीका

Bhor Assembly Election 2024 | What kind of accomplished MLA could not build good quality educational institutions while in power? Mahayuti's Shankar Mandekar criticizes Sangram Thopte

वेल्हे:  Bhor Assembly Election 2024 | सलग सत्ता असूनही चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था तालुक्यात उभारता आल्या नाहीत. त्यामुळं इथल्या मुलांना शिक्षणासाठी गाव सोडावा लागतोय, अशी टीका महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्यावर केली.

निवडणुकीला आठ दिवस राहिलेले असताना मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे वेल्हे तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान तालुक्यातील विविध गावांना मांडेकर यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांच्या समवेत रेवनाथ दारवटकर, रणजित शिवतरे, भगवान पासलकर, किरण राऊत, निर्मला जागडे, कीर्ती देशमुख, संगिता जेधे, संदीप खुटवड, अण्णा देशमाने, राजू रेणुसे, सुनील शेंडकर, कुंदन गंगावणे हे महायुतीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मांडेकर म्हणाले की, वेल्हे या तालूका दुर्गम असला तरी गेल्या ५० वर्षात इथं मूलभूत विकासाची काम झालेली नाहीत. रस्ते, पाणी, वीज इथले सत्ताधारी देऊ शकले नाहीत. एवढच काय तर चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था त्यांना निर्माण करता आलेल्या नाहीत. त्यामुळे इथल्या मुलांना शिक्षणासाठी आपला गाव सोडावा लागतोय.

“रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे तालुका विकासापासून वंचित राहिला आहे विकासाला चालना देण्यासाठी रस्त्यांची सुधारणा करणे गरजेचे आहे. असे सांगताना मांडेकर म्हणाले की, मतदारांनी संधी दिल्यास पुढच्या पाच वर्षात कोणताही पक्षपात न करता मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेऊन विकास करेल हा शब्द देतो.

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर