Bhosari Land Case | एकनाथ खडसेंच्या पत्नीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अटकेची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात (Bhosari Land Case) एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी (दि.12) मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष पीएमएलए कोर्टाने (Special PMLA Court) एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) पत्नी आणि भोसरी जमीन घोटाळा प्रकरणातील (Bhosari Land Case) आरोपी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून (bail application rejected) लावला. तसेच त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी (Non-bailable warrant) करण्यात आले. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देता यावं यासाठी तीन आठवड्याची स्थगिती खडसेंच्यावतीने करण्यात आली. मात्र, कोर्टनं ही मागणी फेटाळून लावली.

मुंबई सत्र न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांना अटक (Arrest) होण्याची शक्यता आहे.
तर एकनाथ खडसे हे सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (Bombay Hospital) दाखल असून तिथं त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले.
याची दखल घेत कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी 21 ऑक्टोबर पर्यंत तहकूब केली.

मागील महिन्यात ईडीकडून (ED) एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
ईडीने तब्बल एक हजार पानांचे आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केलं आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश केला आहे.
या सर्वांवर ईडीकडून मनी लॉड्रिंगचा (Money laundering) आरोप लावला (Bhosari Land Case) आहे.
दरम्यान, अटकेत असेले गिरीश चौधरी यांचा देखील जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता.

 

Web Title : Bhosari Land Case | NCP Leader eknath khadses wife mandakini khadses bail application rejected by court possibility of arrest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MNS-BJP Alliance | मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याने घेतली फडणवीसांची बंगल्यावर जाऊन भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये होणार मोठा बदल, लवकरच येणार ‘हे’ नवं फिचर

Car Buying Guide | नवीन गाडी खरेदी करत आहात का? ‘या’ 5 पॉईंटचा आवश्य विचार करा, अन्यथा घेतल्यानंतर करावा लागेल पश्चाताप!