Bhosari Land Scam Case | भोसरी भुखंड घोटाळा प्रकरण ! एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे ED कार्यालयात हजर

0
61
Bhosari Land Scam Case | pune bhosari land scam case ncp leader eknath khadse wife mandakini khadse appear before ed office for inquiry today
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Bhosari Land Scam Case | पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भुखंड घोटाळा प्रकरणी (Bhosari Land Scam Case) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावले होते. यामुळे मंदाकिनी खडसे या आज (मंगळवारी) सक्तवसुली संचालनालय विभागात दाखल झाल्या आहेत.

याप्रकरणी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांनी मुंबई सेशन न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
पंरतु, 12 ऑक्टोबर रोजी सेशन न्यायालयाकडून त्यांचा हा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता.
मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात खडसे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे त्यांनी अटक होण्याचीही शक्यता आहे.
त्याचबरोबर एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, या प्रकरणी 21 ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी (Bhosari Land Scam Case) घेण्यात येणार आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात ED ने एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
ED कडून 1 हजार पानांचे आरोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यात आले आहे.
या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह 3 कंपन्यांचा देखील आरोपी म्हणून समावेश आहे.
या सर्वांवर ED कडून मनी लॉड्रिंगचा आरोप लावला (Bhosari Land Scam Case) आहे.

 

दरम्यान, भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील ३ एकर जागेचा हा वाद ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केली.
3 कोटी 75 लाख रुपयांना जमिनीची खरेदी पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले.
मात्र, ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं आहे.
रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप ED कडून एकनाथ खडसें यांच्यावर करण्यात आला आहे.

 

Web Title :  Bhosari Land Scam Case | pune bhosari land scam case ncp leader eknath khadse wife mandakini khadse appear before ed office for inquiry today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Beed Crime | ‘रंगेल’ पतीला प्रेयसीसोबत ‘गुपचूप’ ज्यूसचा ‘कार्यक्रम’ करताना पत्नीनं पाहिलं, दोघांना धो-धो धुतलं

Nagpur Crime | नागपुर जिल्ह्यातील संतापजनक घटना ! 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

Pune Crime | 15 वर्षीय मुलीच्या आईशी ‘झेंगाट’ असणार्‍यांनं केलं घृणास्पद कृत्य, ‘तिच्या’शी अश्लिल चाळे करणार्‍यावर FIR, हडपसरमधील धक्कादायक प्रकार