Bhosari MIDC Land Scam Case | एकनाथ खडसेंची पत्नी मंदाकिनी यांना देखील ईडीचं समन्स, गिरीश चौधरीनंतर सासु-सासरे ‘रडार’वर?

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी (Bhosari MIDC Land Scam Case) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावी गिरीश चौधरी (girish chaudhary) यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता ईडीने एकनाथ खडसे यांचीही चौकशी केली आहे. तब्बल ९ तास ही चौकशी सुरू होती. खडसेंसोबतच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांनाही चौकशीचे समन्स ईडीने बजावले आहे . परंतु त्यांनी ईडीने (ED) वेळ वाढवून मागितली असल्याची माहिती मिळत आहे. Bhosari MIDC Land Scam Case | pune bhosari midc land scam ncp leader eknath khadse wife mandakini khadse also summoned by ed for inquiry

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी (Bhosari MIDC Land Scam Case) मंदाकिनी एकनाथ खडसे (Mandakini Eknath Khadse) यांना ७ जुलैला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.
मात्र त्यांनी निवेदन देऊन १४ दिवसांची वेळ मागितली आहे.
त्यावर ईडीने अजून कोणताही अजून कोणताही प्रतिसाद दिला नाही.
गुरुवारी (दि ८) एकनाथ खडसे सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांच्याकडे ईडीने ९ तास चौकशी केली.
रात्री ८च्या सुमारास कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलणं टाळलं.
त्यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार जितक्या वेळा बोलावेल ईडी चौकशीसाठी तितक्या वेळा हजर राहण्याचं खडसेंनी आश्वासन दिल आहे.

खडसेंनी ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य केलं आहे.
ईडीने त्यांच्या संपत्तीची चौकशी केली असून स्टेटमेंट्सची सत्यता तपासली.
ईडीने ज्या कागदपत्रांची मागणी केली होती ती सर्व दिली आहेत.
अजूनही काही कागदपत्रांची ईडीने मागणी केली आहे ती १० दिवसात जमा करण्यात येणार आहेत.
ईडीला चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य करणार असून ज्यावेळी बोलवाल त्यावेळी उपस्थित राहण्याचे आश्वानस एकनाथ खडसेंनी दिल्याचे वकिलांनी सांगितले.

 

चौकशी पूर्वी खडसे (Khadse) काय म्हणाले होते?

ईडी चौकशीमागे राजकीय सुडाचा वास येतोय.
पक्ष बदलानंतर राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे.
जळगावातील व्हॉट्सअँपवरील काही भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे.
यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे.
पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे खडसे यांनी म्हंटलं होत.

Web Title : Bhosari MIDC Land Scam Case | pune bhosari midc land scam ncp leader eknath khadse wife mandakini khadse also summoned by ed for inquiry

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Crime News | ‘बजाज’ मधून निम्म्या किंमतीत गाड्यांचे आमिष पडले साडेसात लाखांना; बजाज कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून दोघा भावांनी घातला व्यावसायिकाला गंडा

Koregaon Bhima Inquiry Commission | कोरेगाव भीमा हिंसाचार आयोग साक्षीसाठी शरद पवार यांना बोलवणार; कोरोनामुळे ठप्प झाले होते कामकाज

Pune Crime News | ‘बेटर हाफ’ वेबसाईटवरून ओखळ झाल्यानंतर लग्नाच्या अमिषाने 28 वर्षीय तरूणीची 9 लाखांची फसवणूक