Bhosari MIDC Land Scam | एकनाथ खडसे ED च्या चौकशीला घाबरत नाहीत, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा भाजपला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Bhosari MIDC Land Scam | भोसरी येथील भुखंड घोटाळाप्रकरणी (Bhosari MiDC Land Scam) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) गुरूवारी ईडीच्या (ED) चौकशीला सामोरे गेले. तब्बल नऊ तास त्यांची चौकशी करण्यात आली. ही चौकशी सुडबुद्धीने केली जात असल्याची भावना एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपला इशारा दिला आहे. अशा प्रकारच्या यंत्रणा मागे लावून राजकीय गणितं बदलण्याचा प्रयत्न असेल तर तो भाजपचा गैरसमज आहे. तसं काहीही घडणार नाही, असा इशारा नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपला दिला आहे.

फडणवीसांनी खडसेंचे खच्चीकरण केलं

नवाब मलिक म्हणाले, एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत. ज्या प्रकरणात ईडी एकनाथ खडसे यांची चौकशी करत आहे त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ खडसे याचं खच्चीकरण केले होते. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली. आता ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चौकशी सुरु असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

कितीही चौकशी लवाली तरी सत्य समोर येईल

ईडी किंवा इतर यंत्रणेमार्फत कितीही चौकशी लावली गेली तरी सत्य आज ना उद्या समोर येणार आहेच. एकनाथ खडसे हे चौकशीला सहकार्य करत आहेत. त्यांनी काहीही केलं नसल्याने ते घाबरत नाहीत. यंत्रणांचा दुरुपयोग करणं हे भाजपचं (BJP) काम आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या ठिकाणी देखील विरोधकांना त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे, असा आरोप मलिक यानी केला.

हे देखील वाचा

Gold Price Today । सोन्याच्या दरात किंचित वाढ तर चांदीच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या आजचे दर

Pune corona | पुणे जिल्ह्यात 107 गावात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, परिस्थिती अद्यापही बिकटच

MPSC | निवड झालेले अधिकारी उतरले रस्त्यावर, पुण्यात चक्काजाम आंदोलन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Bhosari MIDC Land Scam | eknath khadse bhosari land scam ed inquiry ncp leader gives warning to bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update