Bhosari News : खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला दोन वर्षांनी अटक

भोसरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   खंडणीच्या(Ransom) गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खंडणीचा(Ransom) गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार होत होता. अखेर त्याला सोमवारी (दि.4) टेल्को रोडवर अटक करण्यात आली.

साहील उर्फ साईनाथ वसंत धोतरे (वय-21 रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धोतरे याच्यावर दोन वर्षापूर्वी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. धोतरे टेल्को रोडवरील विजय सेल्स समोर थांबला असल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस अंमलदार शरद गांधिले व विजय दौंडकर यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), प्रदिप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार शरद गांधिले, विजय दौंडकर, करण विश्वासे, अनिल जोशी, विशाल काळे, रहिम शेख यांच्या पथकाने केली.