पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

पुणे (भोसरी) : पोलीसनामा ऑनलाइन – गावठी बनावटी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास केली.

अमोल अर्जुन परदेसी (वय-१९ रा. पंचरत्न चौक, वाकड रोड, हिंजवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे कर्मचारी गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी सुमित देवकर व समीर रासकर यांना एक तरूण कंबरेला पिस्टल लावून कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ उभा असल्याची माहिती मिळाली. भोसरी पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला गावठी पिस्टल आढळून आली. पोलिसांनी पिस्टल जप्त करून आरोपीला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ १ पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक गुन्हे देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलास, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी सुमीत देवकर, समीर रासकर, गणेश हिंगे, संतोष महाडीक, आशिष गोपी, सागर भोसले, सागर जाधव, विकास फुले यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –