भोसरी पोलिसांनी केला २.२५ लाखाचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – भोसरी पोलिसांनी वेगवेगळ्या दोन कारवायांमध्ये अटक केलेल्या आरोपींकडून दोन लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

अजय सुखदेव माने (१९, रा. विश्रांतवाडी, पुणे), अविनाश पोपट दुधवडे (१९, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), अनिल राणुजी जावळे (१८, रा. सदगुरुनगर, भोसरी) आणि आदर्श उर्फ कुक्‍या गोविंद जगताप (२८, रा. चऱ्होली) अशी अटक आरोपींचा नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथे एका नागरिकाला मारहण करत त्यला लुटले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी संशयीताना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबुल केले. तपासात अजय आणि आदर्श यांच्यावरील भोसरी पोलीस ठाणे येथील दोन, वाकड, दिघी, फरासखाना येथील प्रत्येकी एक असे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आणखी एका कारवाईमध्ये चोरी करणाऱ्या विलास ढेबे (२२) आणि अजय उत्तम भंडारी (२१) यांनाही अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा एक हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश डिंगे, विपुल जाधव, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, सागर भोसले, बाळासाहेब विधाते, आशिष गोपी, चेतन साळवे यांच्या पथकाने केली.

ह्याही बातम्या वाचा –

फुल विक्रेत्यांकडून ग्राहकावर कोयत्याने वार

उसने घेतलेले पैसे वेळेत देता न आल्याने, सख्या बहिणींनी केले विष प्राशन

प्रकाश आंबेडकरांकडून सुशीलकुमार शिंदेला आव्हान ; सोलापुरात तिरंगी लढत