Advt.

भोसरीमध्ये भाजपच्या महेश लांडगे यांचा दणदणीत विजय

भोसरी :पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या महेश लांडगे यांनी अपक्ष उमेदवार विलास लांडे यांचा मोठ्या मतांनी पराभव केला. मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून विजय मिळवलेल्या महेश लांडगे यांच्यासाठी हि प्रतिष्ठेची निवडणूक होती. तर विलास लांडे यांनी विजयासाठी जोर लावला होता. मात्र अखेर महेश लांडगे यांना आपला किल्ला राखण्यात यश आले.

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने आपला उमेदवार न देता अपक्ष विलास लांडे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच पक्षांनी लांडे यांच्या विजयासाठी जोर लावला होता. मात्र अखेर या अटीतटीच्या लढतीत लांडगे यांनी विजय मिळवला. याआधी २००९ मध्ये अपक्ष म्हणून विजय मिळवलेल्या विलास लांडे यांच्यासाठी कदाचित हि शेवटची विधानसभा निवडणूक ठरू शकते. त्यामुळे आता पुढील विधानसभा निवडणुकीत ते उभे राहण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र या विजयामुळं लांडगे हेदेखील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार ठरणार आहेत.

सविस्तर आकडेवारी थोड्याच वेळात…

Visit : Policenama.com