BHR Scam | बीएचआर घोटाळा ! भाजपचे आमदार चंदूलाल पटेल यांचा अटक पूर्व जामीन मंजूर

अ‍ॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – BHR Scam | बीएचआर घोटाळ्यात (BHR Scam) डेक्कन पोलीस स्थानकात (Deccan Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी भाजप आमदार चंदुलाल पटेल (BJP MLA Chandulal Patel) यांना आज पुणे न्यायालयाने (Pune Court) एक लाख रुपयाच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे., आ. पटेल यांच्यावतीने अ‍ॅड. अनिकेत उज्वल निकम (Add. Aniket Ujwal Nikam) यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

डेक्कन पोलीस स्थानकात (Deccan Police Station) रंजना खंडेराव घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 25 नोव्हेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आर्थिक गुन्हे शाखेने (economic offences wing pune) तपासाला सुरुवात केल्यानंतर फिर्यादीत नाव नसलेले इतर अनेक नंतर आरोपी निष्पन्न झाले होते.
अगदी आ. चंदुलाल पटेल (BJP MLA Chandulal Patel) यांचेही नाव या गुन्ह्यात 17 जून रोजी राबविलेल्या अटकसत्रानंतरच समोर आले होते.
पोलिसांनी चंदुलाल पटेल यांच्याही अटकेचे वॉरंट पोलिसांनी घेतले होते.
परंतू आ. पटेल थोडक्यात इंदूरमधून पोलीसांचे पथक येण्याआधीच तेथून पसार होण्यात यशस्वी झाले होते. दरम्यान, तेव्हापासून आ. पटेल हे बेपत्ता होते.
मध्यंतरीच्या काळात त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती.

 

न्यायालयात युक्तिवाद करताना अ‍ॅड. अनिकेत उज्वल निकम (Adv. Aniket Ujwal Nikam) यांनी सांगितले की पटेल यांनी 2014 मध्ये 2 कोटी कर्ज घेतलेले होते.
त्यावर व्याज लावून ही रक्कम 3 कोटी 77 लाख एवढी झाली होती.
आ.पटेल यांनी यापैकी 70 लाख रुपये कॅश भरली होती. तर उर्वरित 2 कोटी 77 लाख रुपये बाकी होते.
हे कर्ज त्यांनी पावत्या मॅचिंग करून भरले आहे. पावत्या मॅचिंग करणे हा कायद्याने गुन्हा नाही.
अगदी अवसायक जितेंद्र कंडारे यांनी 2017 मध्ये केंद्रीय रजिस्टरकडून याबाबत परवानगी मागितली होती. त्यावर त्यांना कायदेशीर प्रक्रिया राबवून संस्थेच्या हिताच्या दृष्टीने परवानगी देण्यात आली होती.
ज्यावेळेस संस्था ठेवी परत करू शकत नसेल आणि कर्ज वसुली देखील होत नसेल, अशा वेळी पावत्या मॅचिंग प्रक्रिया कायदेशीर असते.
सोसायटीच्या हिताचे जे आहे ते तुम्ही करायला हवे असे त्यांनी कळविले होते.
एकदा अवसायक नेमल्यावर त्याला कर्ज वसुलीचे आणि ठेवीदारांना परत देण्याचे अधिकार आहे.

मॅचिंगच्या माध्यमातून ते पैसे परत मिळू शकत होते. कर्जदार आणि ठेवीदारांनीसोबत बसून ठरवायचे होते. पावत्या मॅचिंग करून आपले पैसे परत मिळविणारे ठेवीदार यांची जर काहीच तक्रार नाहीय.
तर दुसऱ्या कुणाचा संबंध येतो कुठे? चार वर्षात कोणत्याही ठेवीदाराने तक्रार केली नाही.
कर्जदारांना 100 टक्के पैसे द्यायचेच असते तर त्यांनी थेट पतसंस्थेत जमा केले असते.
ठेवीदार आणि कर्जदारांमध्ये आपसात समन्वय साधून झालेला व्यवहार आहे.
कुणावरही जबरदस्ती झाली नाही तर पावत्या मॅचिंग करणे हा गुन्हा कसा? असेही अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
आ.पटेल यांनी सादर केलेले मृत्यू पत्र हा कुटुंबातील घटक म्हणून सादर केले आहे.
युक्तिवाद करताना मी कुठेही या मृत्यूपत्राचा आधार घेतला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

 

सरकारी पक्षाने आ.चंदूभाई पटेल यांच्या कार्यालयावर छापा मारला आणि तेथून महत्वाचे दस्तऐवज मिळाले असे सांगितले पण ते वक्तव्य चुकीचे आहे.
इतर आरोपींना तुरुंगात जावे लागले मग त्यांना जामीन मिळाला असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला असता अ‍ॅड. निकम यांनी, मी आमदार आहे म्हणून मला तुरुंगात पाठवा हे चुकीचे आहे.
तपास यंत्रणेला काय हस्तगत करायचे? हे सांगा. पण तसे काहीही नाही, असे ते म्हणाले.
तसेच आधीच्या संशयितांप्रमाणे आम्ही देखील पैसे भरण्यास तयार आहोत.
परंतू फक्त लोकप्रतिनिधी आमदार आहे म्हणून अटकेची मागणी करणे चुकीचे आहे, असा मुद्दा अ‍ॅड. निकम यांनी मांडला.
यावर न्यायालयाने कर्जाची 20 टक्के रक्कम 10 दिवसाच्या आत तर उर्वरित 20 टक्के रक्कम 3 महिन्याच्या आत भरण्याचे आ.पटेल यांना निर्देश दिले आहेत.
सदर खटल्याचे कामकाज मुंबई उच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. अनिकेत उज्वल निकम आणि पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील अ‍ॅड. सुधीर पाटील यांनी पाहिले.

 

Web Title : BHR Scam | BHR scam! BJP MLA Chandulal Patel granted pre arrest bail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rain in Maharashtra | आगामी 3 दिवस राज्यात जोरदार पाऊस बरसणार; पुण्यासह 7 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी

Afghanistan Crisis | अफगाणिस्तान सोडण्याची घाई पडली महागात, उडणार्‍या विमानातून पडले तीन लोक, टायर पकडून लटकले होते (व्हिडीओ)

Sharad Pawar | शरद पवार यांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला