BHR Scam | बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित, तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाई हिराचंद रायसोनी संस्थेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणातील (BHR Scam) तत्कालीन अवासायक जितेंद्र कंडारे (Jitendra Kandare) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. कंडारे याच्यावर शिक्रापूर (Shikrapur) येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील गुन्ह्यात (BHR Scam) येरवडा कारागृहात (Yerawada Jail) कंडारे याला ठेवले होते. जामिनावर मुक्तता होण्याआधी त्याला पोलिसांनी येरवडा कारागृहातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 29 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरज बनगर (Police Inspector Suraj Bangar) यांनी दिली.

याप्रकरणी संतोष काशिनाथ कांबळे Santosh Kashinath Kamble (रा. लोहगाव, पुणे) यांनी 25 नोव्हेंबर 2020 रोजी शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur police station) फिर्याद दिली होती. संतोष कांबळे यांचे वडिल शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पैसे कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील बीएचआरच्या पतसंस्थेत गुंतवले होते.

मुदत संपल्यानंतर 18 लाख रुपये काढण्यासाठी गेले असता बीएचआर संस्था (BHR Scam) बंद पडल्याचे समजले.
यानंतर कांबळे हे जळगाव येथे मुख्य शाखेत गेले असता कंडारे यांनी केंद्र सरकारने (Central Government) मला नेमले असून कागदपत्रे सही करा.
तुम्हाला वीस टक्के रक्कम देऊ आणि उर्वरित 80 टक्के रक्कम बाबत विचारणा केली असता कंडारे यांनी धमकी (Threat) दिली होती.

 

Web Title :- BHR Scam | suspected in bhr scam jitendra kandare arrested by police in yerwada

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | मिरवणुकीच्या काही तास आधी नवरदेवाने केली आत्महत्या, ‘या’ गोष्टीचा होता राग

Ajit Pawar | तुकाराम सुपेंवरील कारवाईवरुन अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘अधिकाऱ्यांकडे नोटाच मिळायला लागतात’

Nitin Raut | नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडचा दणका, ‘या’ विभागाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं!