विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा कॅम्पसमध्ये गोळ्या घालून खून

वाराणसी : वृत्तसंस्था – बनारस हिंदू विद्यापीठातील निलंबित विद्यार्थ्याचा कॅम्पसमध्ये गोळ्या घालून खून करण्य़ात आला. दुचाकीवरून आलेल्यांनी त्याच्यावर सोमवारी संध्य़ाकाळी गोळ्या झाडल्या. याप्रकरणी विद्यापीठाच्या ४ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचेही नाव तक्रारीत आहे.

गौरव सिंह असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. गौरव सिंह हा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवरून विद्यापीठात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान बस जाळण्यात आली होती. यात गौरवचा सहभाग असल्याच्या कारणावरून त्याला विद्यापीठ प्रशासनाने निलंबित केले होते. दरम्यान, गौरव विद्यापीठाच्या हॉस्टेलच्या कॅम्पसमध्ये मित्रांशी गप्पा मारत उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर ते पसार झाले. गौरवला रात्री ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती जास्तच खराब झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

चार जणांनी गौरव सिंहवर एकूण १० गोळ्या झाडल्या. याप्रकऱणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ ४ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वाराणसीचे पोलीस आयुक्त आनंद कुलकर्णी यांनी दिली आहे.

मात्र, त्याचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच त्याच्या मित्रांनी मोठ्या प्रमाणावर रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. यावेळी सुरक्षारक्षकांसोबत त्यांची बाचाबाचीही झाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like