RT-PCR च्या कचाटयात का येत नाही कोरोना? वॅक्सीन कशामुळं गरजेचं – BHU च्या तज्ञाने सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या भीतीमध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे व्हायरॉलॉजिस्ट प्रोफेसर सुनीत कुमार सिंह यांनी दावा केला आहे की, लस प्रभावी आहे आणि लस घेतल्यानंतर तुम्ही कोरोना पॉझिटीव्ह झालात तर तुमची स्थिती गंभीर होणार नाही. त्यांनी हे ही सांगितले की या वर्षाच्या सुरवातीपर्यंत लोकांनी कोरोनाला गंभीरतेने घेतले. सर्व मार्गदर्शक सूचना मान्य केल्या, परंतू त्यानंतर मास्क लावणे सोडून दिले, सोशल डिस्टंसिंग सोडले, बेजाबदार वागू लागले, त्यामुळे संक्रमणाची गती वाढली. प्रोफेअर सुनीत सिंह बीएचयू च्या इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसेजमध्ये स्थित मॉलिक्युलर बायोलॉजी युनिटचे विभागीय अध्यक्ष आहेत.

काही प्रकरणांमध्ये RT-PCR टेस्ट असफल ठरली आहे. याचे उत्तर देत प्रोफेसर सुनीत कुमार सिंह म्हणाले की, ”मी यास सहमत नाही, कारण ही चाचणी समान सोर्स कोविड आणि जीन्सच्या काही भागांद्वारे घेण्यात आली आहे. त्यामुळे मी पूर्णपणे सहमत नाही की RT-PCR चाचणी अयशस्वी होत असेल, जर असे कोठेही होत असेल तर अशी अनेक तांत्रिक कारणे असू शकतात. जसे की नमुना योग्य प्रकारे गोळा केला जात नाही किंवा जर नमुन्यामध्ये RNA उपस्थित नसेल तर पॉझिटिव्ह व्यक्तीदेखील निगेटिव्ह दिसेल. परंतू येथे तसे होत नाही म्हणजे RT-PCR चाचणी कोरोना व्हायरस शोधण्यास सक्षम नाही.”

लस किती प्रभावी आहे?
यावर प्रोफेसर सुनीत म्हणतात, ”लस प्रभावी आहे. परंतू लस घेतल्यानंतही अनेक लोक पॉझिटीव्ह येत आहेत. लसीचे काम फक्त इंफेक्शन थाबंवणे इतकेच नसते तर लसीची ही खासियत असते की रोगाच्या गंभीरतेला कमी करणे. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की लस घेतल्यानंतर तुम्हाला इंफेक्शन होत असेल तर तुम्हाला गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही. याच्या अगदी उलट लस न घेतल्यास तुम्ही आजाराच्या गंभीर स्थितीमध्ये जाऊ शकता. यासाठी हे आवश्यक आहे की लसीसोबत सर्व सेफ्टी मेजर्स जसे की- मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि सॅनिटायर या नियमांचे पालन करावे लागेल.”

कोरोना संक्रमणाचा जलद फैलाव होण्याचे कारण सांगताना ते म्हणतात की, ”जानेवारी २०२१ च्या आधीचे हेल्थ ऍडवाइजरीला सर्व लोकांनी सक्तीने पालन केले आहे. परंतु जानेवारी २०२१ नंतर लोक बेजबाबदार झाले आहेत. लोक हे मान्य करण्यास तयार नाहीत की असा कोणता रोग देशात आहे. हेच संक्रमण परसण्याचे मुख्य कारण आहे. जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सेफ्टी मेजर्स आणि लसीकरणाचे पालन केले पाहिजे. फक्त सरकार आणि वैज्ञानिक लोकांना दोष दिल्याने काम होणार नाही.”

संक्रमण वाढण्यामागे व्हायरसचे वेगवेगळे प्रकार
ते पुढे म्हणाले की, ”व्हायरस दोन प्रकारचे असतात. DNA आणि RNA. सार्स कोविड एक RNA आधारित व्हायरस आहे. हा अशा प्रकारचा व्हायरस आहे जो म्युटेशन कमी करतो. म्युटेशननंतर त्याचे अनेक प्रकार तयार होतात आणि जे नियमित आढळतात त्यांना ”व्हेरियंट्स ऑफ इंटरेस्ट” असे म्हंटले जाते. त्यानंतर हे शोधले जाते की हा व्हायरस संक्रमणाला वाढविण्यासाठी प्रभावी आहे, तर त्यास ”व्हेरियंट्स ऑफ कॉन्सर्ट” म्हंटले जाते. त्यामुळे व्हायरसची संक्रमकता वाढत जाते आणि मृत्युदरात वाढ होते.

प्रोफेसर सांगतात की, ”कधी कधी असे व्हेरियंट्स येतात की, ज्यामुळे संक्रमकता जास्त असते आणि मृत्युदरही. त्याच्या निदानातही एक समस्या येते, त्याला ”व्हेरियंट्स ऑफ हाई कंसिक्वेन्सेस” असे म्हणतात. आजच्या काळात काही व्हेरियंट्स ऑफ कॉन्सर्ट सापडले आहेत. हे व्हेरियंट्स आधी युकेमध्ये आणि आता भारतात सापडत आहेत. याशिवाय ब्राजील आणि साऊथ आफ्रिकेमध्येही व्हेरियंट्स आहेत. कोणत्याही व्हायरसचे प्रकार होणे ही सामान्य बाब आहे. परंतू यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, जे आमचे वैज्ञानिक करण्यास सक्षम आहेत.”