कर्जवसुलीसाठी भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेचा लिलाव होणार 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

भुजबळ कुटुंबियांच्या मालकीच्या ४२५० चौरस मीटर क्षेत्राच्या पाच बिनशेती मिळकती, ६००.४६ चौरस मीटर क्षेत्रफळाचे कार्यालय यांची ३० नोव्हेंबर रोजी लिलावाद्वारे विक्री करण्याचे दि नाशिक मर्चंट्स सहकारी बँकेने जाहीर केले आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ आणि विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सुमारे साडेचार कोटींचे कर्ज थकीत आहे. या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय या बँकेने घेतला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4c03b43d-c20b-11e8-8e80-c9786828c323′]

मर्चंट्स बँकेने थकीत कर्जापोटी भुजबळ कुटुंबातील काही सदस्यांच्या नावावरील मालमत्ता सरफेसी कायद्यान्वये जाहीर लिलाव करून विक्री करण्याची नोटीस बजावली आहे. समीर आणि पंकज भुजबळ आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक असून या कंपनीला र्मचट्स बँकेने कर्ज दिले होते. १ जानेवारी २०१७ रोजी कर्जाची चार कोटी ३४ लाखांहून अधिकची रक्कम थकली होती. बँकेने मागणी नोटीस पाठविल्यानंतर तारण ठेवलेल्या मालमत्तांचा प्रतीकात्मक ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यात नाशिक शिवारातील सव्‍‌र्हे क्रमांक ७९५/३ मधील ४२५० चौरस मीटर क्षेत्राच्या पाच बिनशेती मिळकती, ६००.४७ चौरस मीटर क्षेत्रासह बांधीव कार्यालय यांचा समावेश आहे. कर्जास जामीनदार, संमतीदार असणाऱ्यांच्या भुजबळ कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावावरील या मालमत्ता आहेत. त्या एप्रिल २०१८ मध्ये बँकेने ताब्यात घेतल्या आहेत. सातपूर येथील र्मचट्स बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात ३० नोव्हेंबर रोजी दुपारी जाहीर लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या मालमत्तांसाठी बँकेने आठ कोटी २२ लाख १८ हजार रुपये राखीव किंमत निश्चित केली असून या लिलावाची जाहीर नोटीस बँकेने प्रसिद्ध केली आहे.

शिवसेनेशिवाय निवडणूका लढण्यासाठी भाजपची तयारी

दरम्यान, मर्चंट्स बँकेवर चार वर्षांपासून प्रशासक नियुक्त आहे. प्रशासकीय कारकीर्दीत बँकेचा एनपीए वाढल्याची तक्रार माजी संचालकांनी केली होती. दुसरीकडे थकीत कर्जाच्या वसुलीला बँकेने वेग दिल्याचे दिसत आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात राष्ट्रवादीचे  नेते छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांना काही महिन्यांपूर्वी जामीन मिळाला होता.

[amazon_link asins=’B07811BTY8,B07811Y98Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ef60baab-c20c-11e8-97a2-01b0e59707ef’]