‘खिलाडी’ अक्षयच्या दौर्‍याबाबत छगन भुजबळांचा यु-टर्न, म्हणाले….

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यावरती आला होता. त्यावरती अक्षय कुमारला हेलिकॉप्टर ची परवानगी कशी देण्यात आली? तो ग्रामीण भागात आल्यानंतर त्याला नाशिक शहरातील पोलिसांचा बंदोबस्त कसा देण्यात आला? जिल्हा प्रशासनास यासंदर्भात माहिती कशी नाही? याबाबत पत्रकरांनी प्रश्न विचारल्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सदर प्रकरणाबाबत आपणास कुठलीही माहिती नसल्याचं सांगितले. तसेच, अक्षय कुमारला कोणी परवानगी दिली याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माहिती घेतली जाईल. मगच या प्रकरणावर संभाषण करणे उचित होईल, असे सांगत माध्यमांनी मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करु नये असेही भुजबळांनी म्हटलं.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात नियोजन करण्यात येत असून आज क्रेडाई, बांधकाम व्यावसायिक जितेंद्र ठाकूर यांच्या व नाशिक महापालिका यांच्या समन्वयातून शहरातील ठक्कर डोम येथे ३५० खाटांच्या ‘कोविड केअर सेंटर’ ची निर्मिंती करण्यात येत असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. तेव्हा पाहणी दरम्यान पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार करत अक्षय कुमार यांच्या नाशिक दौऱ्यासंदर्भात प्रश्न विचारले. नाशिकमध्ये कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार, पावसाचे वातावरण असताना अक्षय कुमारला हेलिकॉप्टरला परवानगी? राज्यात पावसाचे वातावरण असल्याने मुख्यमंत्री पंढरपूरला गाडीने गेले, मंत्री गाडीने फिरत आहेत, असे असताना अभिनेता अक्षय कुमारला परवानगी कशी? अक्षय नाशिकच्या ग्रामीण भागात आल्यावर त्याला शहर पोलिसांनी का सुरक्षा पुरवली? जिल्हा प्रशासनास याबाबत माहिती नव्हती का? असे विचारण्यात आले. तेव्हा मी या प्रकरणाबाबत आपल्याला कोणतेही माहिती नसल्याचं सांगून जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतो असे म्हटलं होत.

परंतु काही माध्यमांनी या माझ्या बोलण्याचा विपर्यास करत अक्षय कुमार यांच्या नाशिक दौऱ्याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले अशा बातम्या प्रसारित केल्या असं म्हणत आपल्या चौकशीच्या वक्तव्यावरुन भुजबळांनी यु-टर्न घेतला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपल्याला सदर प्रकरणाबाबत माहिती दिली असून अभिनेता अक्षय कुमार हे डॉ. आशर यांच्याकडे उपचारासाठी आले होते. तसेच तेव्हा अक्षय कुमार यांनी कोविडच्या पार्श्वभुमीवर केलेल्या चांगल्या सामाजिक कार्याबद्दल, नाशिकचे पोलीस आयुक्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी गेले होते. नाशिक पोलिसांनी त्यांना कोणतेही सुरक्षा व्यवस्था पुरवली नाही. त्यामुळे या प्रकरणात आता कुठलीही संदिग्धता राहिली नसून माध्यमांनी याची नोंद घ्यावी. तसेच या प्रकरणासंदर्भात गैरसमज पसरवू नये, असे आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like