चुकूनही ‘हे’ ७ पदार्थ पुन्हा गरम करू नका, अन्यथा पडेल महागात !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शिल्लक राहिलेले अन्न अनेकजण पुन्हा गरम करून खातात. परंतु, काही पदार्थ असे असतात जे पुन्हा गरम करून खाल्ल्यास त्रासदायक ठरू शकतात. हे पदार्थ कोणते आणि ते खाल्ल्यामुळे कोणता त्रास होतो ते आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत ते पदार्थ

१ चिकन
चिकन पुन्हा गरम करून खाल्ल्यास शरीराला मोठे नुकसान होऊ शकते. हे पुन्हा गरम केल्याने यातील प्रोटीन्सची रचना बदलते. यामुळे शरीरात पचनसंबंधी त्रास सुरू होऊ शकतात.

२ बटाटा
बटाटा शरीरासाठी लाभदायक आहे. परंतु, बटाट्याची भाजी तयार करून ती जास्त काळ ठेवल्यास यातील पोषकतत्व बदलतात. ही भाजी पुन्हा गरम करून खाल्ल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो.

३ मशरूम
या भाजीत प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. ही भाजी पुन्हा गरम करून खाल्ल्याने प्रोटीन्सच्या रचनेत बदल होतो. अशी भाजी खाल्ल्याने अपचनासह हृदयाच्या समस्या वाढू शकतात.

४ भात
अनेक लोक शिल्लक राहिलेला भात गरम करून अथवा फोडणी देऊन खातात. परंतु, असे करू नये. भात पुन्हा गरम केल्याने यातील बॅक्टेरियांची संख्या दुप्पट होते. यामुळे डायरिया होण्याची भिती असते.

५ अंडी
अंड्यात भरपूर प्रोटीन्स असतात. हे पुन्हा गरम खाल्ल्याने यात विषारी घटक निर्माण होतात.

६ चहा
चहामध्ये टॅनीन अ‍ॅसीड असते. यामुळे शरीरात टॉक्सिन्स तयार होतात. चहा पुन्हा गरम करून प्यायल्यास अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. यामुळे लिव्हरशी संबंधीत समस्या वाढू शकतात.

७ पालक
पालकमध्ये जास्त प्रमाणात नायट्रेट असते. हे पुन्हा गरम केल्याने यातील कार्सिनोजोनिकमध्ये बदल होतात. यामुळे विषारी घटक निर्माण होतात.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/